एक्स्प्लोर

हाथरस प्रकरण : अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात आज सुनावणी; पीडित कुटुंबिय रवाना

हाथरस प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी पीडित कुटुंबिय लखनौसाठी रवाना झाले आहेत.

लखनौ : हाथरस प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने हाथरस प्रकरणाची स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली असून उत्तर प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. उच्च न्यायालयाने डीजीपी, एडीजी (कायदा व सुव्यवस्था), डीएम हाथरस, एसपी हाथरस यांना समन्स बजावले होते. दरम्यान, आज पार पडणाऱ्या सुनावणीसाठी पीडितेच्या कुटुंबातील काही सदस्य हाथरसहून अलाहाबादसाठी रवाना झाले आहेत. पीडित कुटुंबातील पाच सदस्य या सुनावणीसाठी कडक सुरक्षेत लखनौला रवाना झाले आहेत.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्यायमूर्ती जसप्रीत सिंग यांनी सुमोटो दाखल करुन घेतली होती. त्यांनी पीडित मुलीचे घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात ही दखल घेतली होती. 1 ऑक्टोबरला अलाहाबाद उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या काही ओळींचा उल्लेख करत सुनावणीला सुरुवात केली होती.

Exclusive | हाथरस प्रकरण : गावच्या प्रधानांची कबुली; म्हणाले, घटनास्थळी उपस्थित होते आरोपी संदीप आणि राम कुमार

सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने वापरलेल्या महात्मा गांधी यांच्या ओळी :

'तुम्हें एक जंतर देता हूं. जब भी तुम्हें संदेह हो या तुम्हारा अहम तुम पर हावी होने लगे तो यह कसौटी आजमाओ. जो सबसे गरीब और कमजोर आदमी तुमने देखा हो उसकी शक्ल याद करो और अपने दिल से पूछो कि जो कदम उठाने का तुम विचार कर रहे हो, वह उस आदमी के लिए कितना उपयोगी होगा? क्या उससे उसे कुछ लाभ पहुंचेगा? क्या उससे वह अपने जीवन और भाग्य पर कुछ काबू रख सकेगा? यानी क्या उससे उन करोड़ों लोगों को स्वराज्य मिल सकेगा, जिनके पेट भूखे हैं और आत्मा अतृप्त है? तब तुम देखोगे कि तुम्हारा संदेह मिट रहा है और अहम समाप्त होता जा रहा है.', असं म्हणत उच्च न्यायालयाने सुनावणीला सुरुवात केली होती.

14 सप्टेंबर रोजी पाशवी अत्याचार, 29 सप्टेंबरला अखेरचा श्वास

14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

तपासासाठी एसआयटीला आणखी 10 दिवसांची मुदतवाढ

हाथरस प्रकरणी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) तपास करत असून बुधवारी एसआयटी आपला अहवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपावणार होती. मात्र आज सकाळीच एसआयटीला आणखी दहा दिवसांचा अवधी मिळाला आहे. गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचा तपास सुरु आहे. या प्रकरणात एसआयटीला तपासासाठी एक आठवड्यांचा मुदत देण्यात आली होती. दरम्यान तपसासाठी आणखी 10 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.

Hathras Gang Rape | पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही!

पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी पीडितेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला होता. धक्कादायक बाब म्हणजे या अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही. परिणामी या अहवालाचा थेट फायदा स्वाभाविकपणे आरोपींना होणार आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे पीडितेच्या कुटुंबीयांना न सांगताच पोलिसांनी गुपचूप अंत्यसंस्कार केले, त्याचप्रमाणे या शवविच्छेदन अहवालातही छेडछाड केली का असाही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने पीडितेचं शवविच्छेदन केलं. या शवविच्छेदन अहवालानुसार, "पीडितेचा मृत्यू मानेचं हाड मोडल्याने झाला आहे." तसंच गळ्यावर जखमांचे निशाण आहे. पीडितेला ब्लड इन्फेक्शन झालं आणि हार्ट अटॅकही आला होता. या तरुणीचा मृत्यू 29 सप्टेंबर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी झाला होता, असं अहवालात नमूद केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Diesel Tax Update : डिझेलवरी टॅक्स दुप्पट, हवाई इंधनावरील टॅक्सही वाढवला; सर्वसामान्यांवर काय परिणाम?
डिझेलवरी टॅक्स दुप्पट, हवाई इंधनावरील टॅक्सही वाढवला; सर्वसामान्यांवर काय परिणाम?
Right To Vote : मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Dosa Batter Crime news: आम्ही नवस फेडायला येऊ! डायरीत लिहलेल्या 'त्या' एका ओळीने पोलिसांची ट्युब पेटली; मुलींच्या डोसा पीठ मृत्यूप्रकरणात ट्विस्ट
आम्ही नवस फेडायला येऊ! डायरीत लिहलेल्या 'त्या' एका ओळीने पोलिसांची ट्युब पेटली; मुलींच्या डोसा पीठ मृत्यूप्रकरणात ट्विस्ट
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?

व्हिडीओ

Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
Embed widget