Gyanvapi Controversy : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असलेल्या ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Mashjid) वाद अद्याप शमला नाही, तोच सुदूर कर्नाटकातही असाच वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता कर्नाटकच्या (Karnataka) राजकारणात खळबळ माजली आहे. दरम्यान, हा वाद कर्नाटकात टिपू सुलतानच्या काळात बांधलेल्या मशिदीचा आहे. ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, ज्या ठिकाणी मशीद आहे तिथे पूर्वी हनुमानाचे मंदिर होते.
हिंदू संघटनेचा दावा काय?
कर्नाटकातील श्रीरंगपटना नावाच्या ठिकाणी जामा मशीद आहे. असे म्हणतात की ते टिपू सुलतानने बांधली होती. पण आता काही हिंदू संघटनांनी दावा केला आहे की, तिथे पूर्वी मंदिर असायचे. जी टिपू सुलतानाने तोडून त्या जागी मशीद बांधली. यावरून वाद सुरू झाला आहे. त्या मशिदीत पूजा करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. तेथे हनुमानाचे मंदिर होते असे उपलब्ध कागदपत्रांवरून सिद्ध होत असल्याचा दावा हिंदू संघटनेने केला आहे. असा दावाही केला जात आहे की, मशिदीच्या भिंतींवर हिंदू शिलालेख सापडले आहेत.
मशिदीच्या बाजूने सुरक्षा वाढवण्याची मागणी
जेव्हापासून हिंदू संघटनांकडून श्रीरंगपटना येथील जामा मशिदीत मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. तेव्हापासून मशिदीच्या बाजूने सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कर्नाटक सरकार किंवा अन्य कोणत्याही मोठ्या संस्थेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
ज्ञानवापी मशिद सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगाची हिंदू पक्षाकडून छायाचित्रे शेअर
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत केलेल्या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी टीमला शिवलिंग (Shivlinga Found In Gyanvapi Mashjid) सापडले, ज्याची छायाचित्रे आता समोर आली आहेत. हिंदू पक्षाकडून सांगण्यात आले की, नंदीच्या मूर्तीजवळ असलेल्या विहिरीची तपासणी केली असता तेथे 12 फुटांचे शिवलिंग आढळले, त्यानंतर न्यायालयाने आता शिवलिंगाभोवती फिरण्यास मनाई करण्याचा आदेश जारी केला आहे. हिंदू पक्षाने शिवलिंगाची छायाचित्रे शेअर करत दावा केला आहे की, ही छायाचित्रे ज्ञानवापी मशिदीतील विहिरीतील शिवलिंगाची आहेत. वाराणसी न्यायालयाच्या आदेशानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर तीन दिवसांच्या पाहणीत घुमट ते तळघर आणि पश्चिमेकडील भिंतीची व्हिडीओग्राफी करण्यात आली असून, ते न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.
ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग नव्हते, कारंजे होते - असदुद्दीन ओवेसी
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ज्ञानवापी मशिदी सर्वेक्षणाबाबत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ओवेसींनी शिवलिंग असल्याच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, मशीद समितीने सांगितले की ते शिवलिंग नसून कारंजे होते. शिवलिंग सापडले असते, तर न्यायालयाच्या आयुक्तांनी हे सांगायला हवे होते.