Gujarat Plane Crash Update News : गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं AI171 हे प्रवासी विमान टेकऑफनंतर अवघ्या काही सेकंदांत भीषण अपघातग्रस्त झालं. लंडनकडे जाणाऱ्या या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमान टेकऑफ झाल्यानंतर काही वेळातच जमिनीवर कोसळले. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होते.
कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसीचे 8200 तासांचा अनुभव असलेले विमानचालक आहेत. सह-वैमानिकाला 11000 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. कॅप्टन सुमित सभरवाल यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विमानावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. पण विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. अपघातस्थळावरून प्रचंड काळा धूर येत असल्याचे दिसून आले.
कोण आहेत कॅप्टन सुमित सभरवाल?
कॅप्टन सुमित सभरवाल हे एअर इंडियाचे अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित पायलट आहेत. त्यांच्या नावे हजारो तासांचं फ्लाइट अनुभव आहे. AI171 या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाचं नेतृत्व त्यांच्या हाती होतं.
घटनेच्या क्षणी, विमान टेकऑफ करत असताना अचानक तांत्रिक बिघाड आणि अडथळ्यांमुळे परिस्थिती हाताबाहेर जात होती. अपघातापूर्वी विमानाच्या पायलटनं जवळच्या एटीसीला एक सिग्नल पाठवला होता, पण त्यानंतर विमानानं एटीसीला कोणताही सिग्नल दिला नाही. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान क्रॅश झालं.
विजय रूपाणी सुद्धा करत होते प्रवास...
या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मोठी बातमी म्हणजे, या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते. विजय रूपाणी यांच्या प्रवासाची माहिती आधी फक्त सूत्रांमधून समोर येत होती, पण आता त्यांच्या नावाचा अधिकृत बोर्डिंग पास सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे बातमीला दुजोरा मिळाला असून, त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे, मात्र याबाबत अजून अधिकृत पुष्टी बाकी आहे.
हे ही वाचा -
