आरोपी प्रवीण हा तीन दिवसांपूर्वी साबरमती जेलमधून फरार झाला होता. क्राईम ब्रांच त्याचा कसून शोधही घेत होती. पण काल रात्री 1च्या दरम्यान, आरोपीला त्याची आई आशाबेन या स्वत: क्राईम ब्रांचमध्ये घेऊन आल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला पोलिसांच्या हवाली केलं.

आरोपी 19 फूटांची भिंत ओलांडून जेलमधून फरार झाला होता. 48 तासांनंतर प्रवीणच्या आईनं पोलिसांना फोन करुन सांगितलं की, ती आपल्या मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण जेलमधून पळून गेल्यानंतर सगळ्यात आधी कलोल येथे आपल्या प्रेयसीला भेटला. दरम्यान, जेलच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी पोलीस आणि जेल प्रशासनाचीही चौकशी सुरु आहे.