Good news for Air Passengers : विमान प्रवाशांसाठी (Air Passengers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताच्या नागरी विमान वाहतूक नियामक संस्था DGCA ने मोठा निर्णय घेतला आहे. बुकिंगनंतर 48 तासांच्या आत तिकीट बदलल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. एअरलाईन्सना 14 दिवसांच्या आत रिफंड देणे बंधनकारक आहे. या निर्णयामुळं ट्रॅव्हल सीझन आणि सुट्ट्यांपूर्वी हवाई प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

प्रवाशांना आता 48 तासांच्या आत मोफत बदल किंवा रद्द करण्याची सुविधा मिळणार

बुकिंगनंतर 24 तासांच्या आत नावातील दुरुस्ती/बदल एअरलाईन्सच्या वेबसाइटवरुन करता येणार आहे. हवाई प्रवाशांसाठी (Air Passengers) महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. भारताच्या नागरी विमान वाहतूक नियामक संस्था DGCA ने हवाई तिकीट परतावा नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. प्रवाशांना आता 48 तासांच्या आत मोफत बदल किंवा रद्द करण्याची सुविधा मिळणार आहे. यासोबतच रिफंड प्रक्रिया जलद करण्यात आली असून नाव दुरुस्ती आणि वैद्यकीय कारणांमुळं तिकीट रद्द करण्याबाबतचे नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत. यापूर्वी रिफंडमध्ये होणाऱ्या विलंबाच्या तक्रारी दूर करण्यासाठी हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नवीन नियमांचा विमान प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे, 

हवाई तिकीट रिफंड नियमांमध्ये प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी घेतला महत्वाचा निर्णय

नागरी विमानचालन महासंचालनालय (DGCA) ने हवाई तिकीट रिफंड नियमांमध्ये प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. 'लुक-इन ऑप्शन' (Look-in option) हा एक प्रमुख प्रस्ताव आहे, ज्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगनंतर 48 तासांच्या आत कोणत्याही शुल्काशिवाय तिकीट रद्द करता येईल किंवा बदलता येईल. या बदलांमुळे प्रवाशांचे हक्क आणि लवचिकता लक्षणीयरीत्या सुधारेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे विमान प्रवासावरील ग्राहकांचा विश्वास वाढू शकतो. एअरलाइन्सना तिकीट रद्द करणे/बदलणे या शुल्कांमधून मिळणाऱ्या महसुलात बदल जाणवू शकतो, परंतु ग्राहक निष्ठा आणि रिफंड प्रक्रियेतील सुलभतेमुळे त्यांना फायदा होऊ शकतो. एजंटच्या जबाबदारीबद्दलची स्पष्टता प्रवाशांसाठी रिफंड प्रक्रिया अधिक सुलभ करेल. जेव्हा तिकीट ट्रॅव्हल एजंट्स किंवा ऑनलाइन पोर्टल्सद्वारे खरेदी केले जातात, तेव्हा रिफंडची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी एअरलाइन्सवर असेल, कारण हे एजंट्स त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात.

महत्वाच्या बातम्या:

विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! देशभरात तब्बल 200 हून उड्डाणे रद्द, विमानसेवेवर मोठा परिणाम, नेमकं कारण काय?