Gold Price Today : मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी पूरक वातावरण दिसत आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये सोमवार 3 मे 2021 या दिवशीसुद्धा कपात होत असल्याचं दिसून आलं. एप्रिल महिना अखेरीपासून सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाल्याचं चित्र दिसत होतं. हेच चित्र आता मे महिन्याच्या सुरुवातीलाही दिसत आहे. शुक्रवारी अखेरच्या सत्रात सोन्याच्या दरांत 191 रुपयांनी कपात झाली. तर, चांदीचे दर 1091 रुपयांनी कमी झाले. सोमवारीही सोन्याच्ये दरांत 100 रुपयांची कपात पाहायला मिळाली. 


गोल्ड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1 ग्रॅमवर 4,516, 8 ग्रॅमवर 36,128 आणि 10 ग्रॅमवर 45,160 तर, 100 ग्रॅमवर 4,51,600  इतका दर आकारला जात आहे. देशातील मुख्य शहरांमध्येही सोन्याचे दर असेच पाहायला मिळत आहेत. 


दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 43,800 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,570 इतकी आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 44,160 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 45,160 इतकी आहे. कोलकात्यामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,110, 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,810 रुपये. तर चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 44,100  आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 48,110 रुपये इतके आहेत. हे दर प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी आकारले जात आहेत. 


Covid-19 Vaccine Shortage : देशात आणखी 2-3 महिने लसींचा तुटवडा जाणवेल : अदर पुनावाला 


सध्याच्या घडीला चांदीचे दर 67,500 रुपये प्रती किलो इतके आहेत. दिल्लीमध्ये चांदीचे दर प्रती किलो 67,500 इतकी आहे. तर मुंबई आणि कोलकातामध्येही हे दर इतकेच आहेत. चेन्नईमध्ये चांदीचे दर 72,800 प्रती किलो इतका आहे.