Gold Price Today : मंगळवारी स्थानिक सराफा बाजारांमध्ये सोन्याचे दर 97 रुपयांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. नवी दिल्लीमध्ये हे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 46,758 इतके होते. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या हवल्यानं ही माहिती मिळाली. अखेरच्या सत्रात सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी  46,661 इतकी दिसून आली. तर, चांदीचे जर 1,282 रुपयांच्या वाढीसह 70,270 रुपयांवर गेले. 


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांत किरकोळ घसरण पाहायला मिळाली. तर वायदा बाजारातही असंच काहीसं चित्र दिसून आलं. वायदा बाजारात सोन्याचे दर 158 रुपयांनी घसरल्याचं दिसून आले. 


गोल्ड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यावर 45,580 तर, 100 ग्रॅमवर 4,55,800  इतका दर आकारला जात आहे. देशातील मुख्य शहरांमध्येही सोन्याचे दर असेच पाहायला मिळत आहेत. 


दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 45790 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,990 इतकी आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 44,580 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 45,580 इतकी आहे. कोलकात्यामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,530, 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,320 रुपये. तर चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 44,530  आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 48,580 रुपये इतके आहेत. हे दर प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी आकारले जात आहेत. 


Oxygen Plant : ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राकडून देशभरात उभारले जाणार 581 PSA प्लांट - नितीन गडकरी 


मागील दहा दिवसांमध्ये सोन्याच्या दरांत अशाच पद्धतीचा चढ उतार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अनेक निर्बंध लागू केले आहेत. असं असतानाही नियमांना अनुसरूनच काही लग्नसमारंभ आणि शुभकार्यही पार प़डत आहेत. अशी मंडळी मागील काही काळापासून सोनं खरेदीला प्राधान्य देताना दिसत आहेत.