एक्स्प्लोर

Goa CM Oath Ceremony : प्रमोद सावंत यांनी कोकणी भाषेत घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ 

प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.

Goa CM Oath Ceremony : प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. आजचा हा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील यावेळी उपस्थित होते.

मोठ्या दिमाखात प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्रीपदाचा सोहळा आज संपन्न झाला. सावंत यांच्यासोबत अन्य 8 आमदारांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. पाहुयात कोणत्या आठ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. 


Goa CM Oath Ceremony : प्रमोद सावंत यांनी कोकणी भाषेत घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ 
 
या आठ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ 

1) विश्वजीत राणे
2) माविन गुदिन्हो
3) रवी नाईक
4) रोहन खंवटे
5) गोविंद गावडे
6) बाबूश मोन्सेरात
7) सुभाष शिरोडकर 
8) नीलेश काब्राल


वरील आठ आमदारांना प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे.  आज एकूण 9 जणांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. यामध्ये 20 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तसेच भाजपने गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या ( MGP) 2 आमदारांनी आणि तीन अपक्ष आमदारांना पाठिंब्याची पत्रे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना सुपूर्द केली आहेत. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पुढील सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर आज शपथविधी सोहळा संपन्न झाला.


Goa CM Oath Ceremony : प्रमोद सावंत यांनी कोकणी भाषेत घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ 

प्रमोद सावंतांचा राजकीय प्रवास

डॉ. प्रमोद सावंत यांची राजकीय कारकीर्द कोल्हापुरातून सुरु झाली. जेव्हा ते तिथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्याचवेळी त्यांनी महाविद्यालयाच्या सरचिटणीस (GS) पदाची निवडणूक जिंकून आपले नेतृत्वगुण दाखवून दिले होते. बारावीपर्यंत गोव्यात शिक्षण घेतल्यानंतर सावंत यांनी पुढील शिक्षणासाठी 1991 मध्ये कोल्हापूरच्या रंकाळवेश दुधाळी परिसरात असलेल्या गंगा आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी ते रंकाळा परिसरात भाड्याने राहत होते.


Goa CM Oath Ceremony : प्रमोद सावंत यांनी कोकणी भाषेत घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ 

प्रमोद सावंत यांचे नेतृत्वगुण ओळखून त्यांच्या महाविद्यालयातील मित्र परिवाराने त्यांना 1992 मध्ये सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत उभे केले. या निवडणुकीत ते प्रचंड बहुमतांनी जिंकले. यातून खर्‍या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. 1997 मध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ ही पदवी मिळवली. त्यादरम्यान त्यांनी अनेक लोकांशी संपर्क साधला. प्रमोद सावंत हे 2012 मध्ये पहिल्यांदा गोव्यातील साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या कोल्हापूरच्या 1997 च्या बॅचने सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी झाले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले. पुढे दिवंगत भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांची पहिल्यांदा 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

Goa CM Oath Ceremony : प्रमोद सावंत यांनी कोकणी भाषेत घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget