आरोपी बाईकवरुन तरुणींच्या ग्रुपचा पाठलाग करत अश्लील शेरेबाजी करत होते. सुरुवातीला तरुणींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हा प्रकार पाहूनही पोलिसांनी दुर्लक्ष करत कोणतीही कारवाई केली नाही. अखेर संतापलेल्या एका तरुणीने पोलिसांची लाठी घेतली आणि रोडरोमियोंना तुफान मारहाण केली.
रस्त्यावर छेडछाड करणाऱ्यांना तरुणीने लाठीने चोपलं. यावेळी आजूबाजूला गर्दी जमली. तरुणीचा दुर्गावतार पाहून बघेही आवाक् झाले. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.
गर्दीमधील कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून तो शेअर केला जात आहे. परंतु त्या मुलींची साथ देण्याची हिंमत कोणीही दाखवली नाही.
पाहा व्हिडीओ