गाझियाबाद: गाझियाबादमध्ये एकत्र आत्महत्या केलेल्या तीन अल्पवयीन बहिणींच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. या प्रकरणात मुलींनी वापरलेले मोबाईल (Ghaziabad Sister Death) फोन महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे पोलिसांनी आता ते विकले गेलेले फोन शोधण्यावर भर दिला आहे. या तिन्ही बहिणी कोणत्यातरी टास्क-बेस्ड ऑनलाइन गेमच्या आहारी गेल्या होत्या (Ghaziabad Sister Death) का, विशेषतः ‘कोरियन गेम’ किंवा कोरियन संस्कृतीशी संबंधित अॅप्समुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले का, याची पडताळणी पोलिस करत आहेत. यासाठी मोबाईलमधील डेटा मिळणे अत्यावश्यक आहे. (Ghaziabad Sister Death)
IMEI नंबर मिळाले, पण फोन विकले गेले
पोलिस तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, मुली वापरत असलेल्या मोबाईल फोनचे IMEI नंबर पोलिसांना मिळाले आहेत. मात्र अडचण अशी आहे की, हे फोन त्यांच्या वडिलांनी यापूर्वीच विकले होते. त्यामुळे आता त्या मोबाईलचे सध्याचे खरेदीदार शोधून फोन जप्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. (Ghaziabad Sister Death
वडिलांचा दावा: मुली गेमिंगच्या आहारी
डीसीपी निमिष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पोलिसांनी मुलींचे वडील चेतन कुमार आणि त्यांच्या पत्नीची सुमारे दोन तास चौकशी केली. वडिलांचा दावा आहे की, त्यांच्या मुलींना ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागले होते. कोरियन संस्कृतीकडे वाढता कल पाहून त्यांनी दोन्ही मुलींचे मोबाईल जप्त केले होते आणि नंतर ते विकले. निशिका हिच्यासाठी सुमारे तीन महिन्यांपूर्वी, तर प्राचीसाठी १५ दिवसांपूर्वी मोबाईल खरेदी करण्यात आला होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली. (Ghaziabad Sister Death
डेटा रिकव्हरीतून सत्य उघड होणार
पोलिसांच्या मते, मोबाईल फोन पुन्हा मिळाल्यानंतर त्यातील डेटा रिकव्हर करून कोणते अॅप्स, गेम्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरले जात होते, हे स्पष्ट होऊ शकते. त्यानंतरच ‘कोरियन गेम’मुळे आत्महत्येचा दावा खरा की खोटा, यावर शिक्कामोर्तब होईल.
प्राथमिक तपासात ठोस पुरावे नाहीत
आतापर्यंतच्या तपासात कोरियन टास्क-बेस्ड गेम वापरल्याचे ठोस पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत. मात्र, बहिणींच्या खोलीत सापडलेली नऊ पानी पॉकेट डायरी, कोरियन संस्कृतीबद्दल असलेले आकर्षण आणि कौटुंबिक तणावाचे उल्लेख तपासासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाला सध्या आत्महत्या म्हणून नोंदवले असून, सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
