Galgotia University News : देशाची राजधानी दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिट सुरु आहे. यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गालगोटिया विद्यापीठाला एआय समिट एक्स्पो तात्काळ रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. रोबोटिक कुत्र्याच्या प्रदर्शनावरुन वाद निर्माण झाल्यानंतर गलगोटियास विद्यापीठाला एआय समिट एक्स्पो रिकामा करण्यास सांगण्यात आले.

Continues below advertisement

मंगळवारी सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्रेटर नोएडाच्या या संस्थेने तातडीने कारवाई केली आहे. क्लिपमध्ये, विद्यापीठाचे प्रतिनिधी त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उत्पादन म्हणून रोबोटिक कुत्रा सादर करताना दिसत होते.

नेमका प्रकरण काय?

सोशल मीडियावर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर नेहा सिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्या एका रोबोटिक डॉगला ओरियन असे संबोधून, तो युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसने तयार केल्याचा दावा करताना दिसल्या. मात्र, टेक तज्ज्ञांनी तातडीने हा दावा खोडून काढला. हा रोबोट प्रत्यक्षात चीनच्या यूनिट्री कंपनीचा Go2 मॉडेल असून तो बाजारात 2 ते 3 लाख रुपयांना सहज उपलब्ध आहे.

Continues below advertisement

चिनी रोबोट

गालगोटिया विद्यापीठाने शिखर परिषदेदरम्यान सादर केलेल्या रोबोटिक कुत्र्याची ओळख चीनी रोबोट युनिट्री गो2 म्हणून झाली आहे, जो चीनी रोबोटिक्स फर्म युनिट्री रोबोटिक्सने बनवलेला व्यावसायिकरित्या उपलब्ध मॉडेल आहे. शिखर परिषदेत, रोबोट "ओरियन" या नावाने सादर करण्यात आला.

गालगोटिया विद्यापीठाच्या प्राध्यापक नेमकं काय म्हणाले?

एआय इम्पॅक्ट समिटमध्ये चिनी बनावटीच्या रोबोडॉगच्या प्रदर्शनाभोवती झालेल्या वादानंतर, गॅलगोटियास विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉ. ऐश्वर्या श्रीवास्तव म्हणाल्या, आम्ही कधीही तो (रोबोडॉग) तयार केल्याचा दावा केला नाही; तो आमच्या एआय गुंतवणुकीचा एक भाग होता. तो खूप गैरसमज झाला होता. संस्थेने एक अधिकृत स्पष्टीकरण जारी केले, ज्यामध्ये विद्यापीठाविरुद्ध अपप्रचार बद्दल चिंता व्यक्त केली गेली. विद्यापीठाने म्हटले आहे की रोबोटिक प्रोग्रामिंग हा विद्यार्थ्यांना एआय अॅप्लिकेशन्स कसे तयार करायचे हे शिकवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यामुळे त्यांना जगभरात उपलब्ध असलेली साधने आणि संसाधने वापरून वास्तविक-जगातील कौशल्ये विकसित आणि लागू करता येतात.

काँग्रेसची मोदी सरकारवर जोरदार टीका

या प्रकरणावरुन आता राजकारणही तापले आहे. काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चीनच्या रोबोट्सना भारताचे उत्पादन म्हणून दाखवून मोदी सरकारने जागतिक स्तरावर देशाची थट्टा केली आहे. चिनी प्रसारमाध्यमेही आता भारतावर हसत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली. दुसरीकडे ही समिट केवळ एक पीआर तमाशा बनली आहे. भारताच्या टॅलेंटचा वापर करण्याऐवजी चीनच्या उत्पादनांचे प्रदर्शन केले जात आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI