एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातील क्रीडारत्नांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि कांस्यविजेती पैलवान साक्षी मलिक यांच्या सोबतच जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि पिस्टल नेमबाज जीतू राय यांचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न पुरस्कारानं गौरव झाला. यंदा पहिल्यांदाच चार खेळाडूंना ‘खेलरत्न’ने गौरवण्यात आले.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका खास सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी सिंधू, साक्षी, दीपा आणि जीतूला खेलरत्न प्रदान केला. त्याशिवाय यंदा पंधरा खेळाडूंचा अर्जुन पुरस्कारानेही गौरव करण्यात आला.
ऑलिम्पिकमध्ये स्टीपलचेस शर्यतीची फायनल गाठणारी साताऱ्याची धावपटू ललिता बाबर आणि मुंबईकर क्रिकेटर अजिंक्य रहाणेलाही अर्जुन पुरस्कार दिला गेला. तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी सहा प्रशिक्षकांची निवड झाली आहे.
विनेश फोगटसाठी राष्ट्रपती व्यासपीठावरुन खाली उतरले!
पैलवान विनेश फोगटला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रिओ ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे विनेशला माघार घ्यावी लागली होती. दुखापतीमुळे व्हिलचेअरवर आलेल्या विनेशला सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपती स्वत: व्यासपीठावरुन खाली उतरले आणि विनेशचा अर्जुन पुरस्काराने गौरव केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
Advertisement