लखनऊ : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये निर्माणाधीन असलेल्या फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत जवळपास 16 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कँट स्टेशनजवळ या फ्लायओव्हरचं काम सुरु होतं. मात्र आज मंगळवारी संध्याकाळी अचानक या फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला. फ्लायओव्हरच्या खाली असलेल्या रस्त्यावर वाहतूक सुरु होती.
या फ्लायओव्हरच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले आहेत. फ्लायओव्हरखालून जाणाऱ्या अनेक कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून त्यात अनेकजण अडकले आहेत. मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही दु:खद घटना असल्याचं म्हटलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.
वाराणसीत फ्लायओव्हरचा भाग कोसळला, गाड्यांचा चेंदामेंदा, 16 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 May 2018 07:10 PM (IST)
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये निर्माणाधीन असलेल्या फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत जवळपास 16 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -