मुंबई : विराथ भारती ही देशातील पहिला महिला कॅब ड्रायव्हर असून मंगळवारी तिने गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 

भारतीने आपल्या राहत्या घरी कपड्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट मिळाली नसल्याचे संजयनगरच्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षकांनी सांगितले. केवळ तिच्या घरातून दोन मोबाईल मिळाले, यातील एक फोन लॉक करण्यात आला होता. तर दुसऱ्या मोबाईलमधील सर्व मॅसेज डिलिट करण्यात आले होते.

 

भारती ही मुळची आंध्रप्रदेशची असून सध्या ती बंगळुरूच्या नागाशेट्टी हल्ली कॉलनीमध्ये एकटीजच राहत होती. तिने आपल्या करिअरची सुरुवात एंजल कॅब या संस्थेमधून केली होती. 2014 साली तिने उबर कॅबमध्ये ती रुजू झाली. भारतीच्या आत्महत्येची माहिती घरमालकामनेच पोलिसांना दिली.

 

घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या काही दिवसांपासून गावी परतण्याच्या विचारात होती. गेल्या काही दिवसांपासून ती कुठेही न दिसल्याने चौकशी करण्यासाठी घरमालक जेव्हा तिसऱ्या मजल्यावर गेले तेव्हा त्यांना भारतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले. यानंतर घरमालकांनी तत्काळ याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

 

या घटनेवर भारतीच्या कंपनीने ही घटना धक्कादायक असल्याचे सांगितले आहे.