हैदराबाद : पॉर्न व्हिडीओ पाहण हैदराबादमधील एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण, पॉर्न व्हिडीओ पाहात असल्याचं लक्षात येताच बापाने आपल्या मुलाच्या हाताची बोटं तोडली आहेत. हैदराबादच्या राचाकोंडामधील ही घटना आहे.
राचाकोंडामधील कय्यूम कुरैशीचा खाटीकखाना आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून मुलांच्या वर्तणुकीमुळे त्रस्त होता. मुलगा खालिद दिवसभर मित्रांसोबत भटकायचा, आणि आपल्या वडिलांची एकही गोष्ट ऐकायचा नाही.
कय्यूमने खालिदसाठी एका खासगी केबल टीव्हीमध्ये नोकरीदेखील बघितलं होतं. पण ते करण्यासही त्याने नकार दिला होता. उलट तो दिवसभर फोनवरच असायचा.
एक दिवस कय्यूमला आपला मुलगा मोबाईलवर पॉर्न वेबसाईटवरचे व्हिडीओ पाहात असल्याचे समजले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने आपल्या मुलांच्या हाताची बोटंच तोडली. या घटनेनंतर जखमी खालिदला रुग्णालयात दाखल केल्यानंतर, कय्यूम पोलिसांना शरण गेला.
पॉर्न पाहणाऱ्या मुलाच्या हाताची बोटं बापानेच तोडली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Mar 2018 03:59 PM (IST)
पॉर्न व्हिडीओ पाहात असल्याचं लक्षात येताच बापाने आपल्या मुलाच्या हाताची बोटं तोडली आहे. हैदराबादच्या राचाकोंडामधील ही घटना आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -