Farmers Protest : तिनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मोदींच्या निर्णयानंतर अनेक मीम्सही नेटकऱ्यांकडून शेअर केले जात आहेत. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचंही बोललं जात आहे. 


दरम्यान, गुरुनानक जयंतीनिमित्त देशाला संबोधित करताना मोदींनी कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. 
 
कृषी कायदे मागे घेण्याच्या मोदींच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस 









महत्त्वाच्या इतर बातम्या :