मुंबई : देशभरात आज ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. मुस्लीम बांधवांनी ठिकठिकाणी नमाज पठणासाठी गर्दी केली आहे. नमाजनंतर घरांमध्ये बोकडांची कुर्बानी देऊन सुन्नते इब्राहीमी अदा साजरी होईल.


बकरी ईदच्या निमित्ताने बाजारपेठाही फुलल्या आहेत. रविवारी चंद्रदर्शन न झाल्याने सोमवारऐवजी मंगळवारी म्हणजे आज बकरी ईद साजरी होत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आज बकरी ईदची सुट्टी आहे.

दरम्यान, बकरी ईदच्या दिवशी बोकडांची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे देशासह राज्यातही बकरी आणि बोकडांची मागणी वाढली आहे. परिणामी बाजारात बोकडांच्या किंमतीही वाढल्या आहेत.