नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या यशस्वी शोधामुळे नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. ICMR द्वारे विकसित पुरुष गर्भनिरोधक RISUG ची क्लिनिकल चाचणी 303 व्यक्तींमध्ये घेण्यात आली आहे. या चाचण्यांमध्ये गर्भधारणा रोखण्यासाठी ते 99 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आलं आहे. RISUG हे सिंगल यूज पुरुष गर्भनिरोधक आहे ज्यामध्ये उच्च परिणामकारकता आणि कमी अयशस्वी दर आहे. क्लिनिकल चाचणी अभ्यास गेल्या महिन्यात अॅड्राॅलाॅजी (Andrology) जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
अभ्यासाच्या आधारे, हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, RISUG मध्ये अॅझोस्पर्मियाच्या (वीर्यांमध्ये व्यवहार्य शुक्राणूंची अनुपस्थिती) बाबतीत त्याची (रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म अंडर गाईडन्स) (Reversible Inhibition of Sperm Under Guidance) परिणामकारकता 97.6 टक्के होती. औषध अयशस्वी झाल्यामुळे गर्भधारणेच्या घटनांवर आधारित एकूण परिणामकारकता 99.02 टक्के होती.' RISUG हे पुरुष गर्भनिरोधक म्हणून विकसित केले गेले आहे. पुरुष नसबंदी (vasectomy) ही जगातील एकमेव नसबंदी सध्या प्रचलित पद्धत आहे.
RISUG कसे कार्य करते?
RISUG ला रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म अंडर गाईडन्स म्हटले जाते. यामधून शुक्राणू वाहिनीमध्ये इंजेक्ट केले जाते. शुक्राणू अंडकोषातून पुरुषाच्या लिंगापर्यंत शुक्राणू वाहिनीद्वारे प्रवास करतात. एकदा रेसिग इंजेक्ट केल्यावर, त्यामुळे पॉलिमर शुक्राणू वाहिनीच्या आतील भिंतीला चिकटतात. जेव्हा ते निगेटिव्ह शुक्राणूंच्या संपर्कात येतात तेव्हा ते त्याची शेपटी नष्ट करतात. अंड्याच्या संपर्कात आल्यानंतरही अंडी फलित होत नाही.
उत्कृष्ट परिणाम दिसून आले
या अभ्यासाचे प्रमुख संशोधक आरएस शर्मा म्हणाले की, अशा उत्पादनाची परिणामकारकता दोन निकषांच्या आधारे निर्धारित केली जाते. गर्भधारणा आणि शुक्राणूंची व्यवहार्यता. ते पुढे म्हणाले की, 'ICMR ने विकसित केलेल्या औषधाने निर्धारित निकषांवर आधारित उत्कृष्ट परिणाम दिले आहेत. आरएस शर्मा म्हणाले, 'या उत्पादनामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकप्रिय आधुनिक पुरुष गर्भनिरोधक म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे.'
इतर महत्वाच्या बातम्या