ED Raid in Noida Exposes Adult Video Scam couple : उत्तर प्रदेशातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. ईडीने नोएडा येथील एका दाम्पत्याच्या घरावर छापा टाकलाय. उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव या दाम्पत्याच्या घरावर ईडीने धाड टाकलीये. उज्ज्वल आणि नीलूकडून घरात मॉडेल आणून देसी Adult व्हिडीओचं शूटिंग करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. देसी Adult व्हिडीओ शूट करुन दाम्पत्याने हे व्हिडीओ साईप्रस स्थित एका कंपनीला विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अश्लील वेबसाईटचं संचालन करण्यासाठी ओळखली जाते.
पॉर्न व्हिडीओ शूट करुन लाखो रुपये मिळवले
उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव यांनी Subdigi Ventures Private Limited नावाची एक कंपनी बनवली होती. या कंपनीच्या माध्यमातून या दोघांनी मोठं कांड केलंय. दोघांनी त्यांच्या घरी पॉर्न व्हिडिओ शूट केला आणि सायप्रस स्थित टेक्निअस लिमिटेड या कंपनीत शेअर केल्याचा आरोप आहे. ईडीच्या माहितीनुसार, तो echnius Limited, Xhamster आणि Stripchat चा ऑपरेटर आहे.
FEMA चं उल्लंघन केलं, ईडीकडून कारवाईला सुरुवात
ईडीने सांगितलं की, Subdigi Ventures आणि त्याला संचलित करणाऱ्या जाहिराती, मार्केटमधील रिसर्च आणि मत सर्वेक्षण यासारख्या सेवांसाठी त्यांच्या खात्यांमध्ये नियमितपणे परदेशी लोक पैसे पाठवत होते. मात्र, हा पैसा कथितरित्या Xhamster स्ट्रिमिंग झालेल्या अडल्ट कंटेटमधून प्राप्त झाला असल्याचं बोललं जातयं. ईडीच्या माहितीनुसार, हे प्रकरण FEMA चे उल्लंघन आहे. कारण हा पैसा अडल्ट कंटेट पुरवण्यासठी दिला जात आहे. हे सर्व बेकायदेशीर आहे.
Adult व्हिडीओ शूट करण्यासाठी आणलेल्या मॉडेल्सचा जबाब नोंदवला
ईडीने धाड टाकल्यानंतर Adult व्हिडीओ शूट करण्यासाठी आणलेल्या मॉडेल्सचा जबाब नोंदवलाय. याशिवाय बँक व्यवहार आणि पैशांची देवाण घेवाण या संदर्भातील डेटाची चौकशी करण्यात येत आहे. ईडीने सांगितलं की, या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकते. पुढील कारवाई करण्यासाठी ईडीने योजना आखली आहे. देशातील पॉर्न कंटेट बनवणारं नेटवर्क यामुळे समोर आलंय. विदेशातील पैसा मिळवून लोक काय करत आहेत? हे यातून समोर आलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
