मुंबई : 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणात 'कॉकरोच जनता पार्टीने' (CJP) जंतर-मंतरवर केलेल्या ऐतिहासिक आंदोलनानंतर आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर देशातील तरुणाईचा राजकीय दबाव वाढताना दिसत आहे. सीजेपीच्या या अभूतपूर्व यशावरून प्रेरणा घेत आता 'E20 जनता पार्टी' (E20JP) नावाचा नवीन गट मैदानात उतरला आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याच्या (E20 Petrol) केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करत, वाहनधारकांना 100 टक्के शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा कायदेशीर पर्याय उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
E20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया पेजची स्थापना झाल्यानंतर, इन्स्टाग्रामवर काहीच वेळात याचे फॉलोअर्सची संख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी प्रमाणे E20 जनता पार्टीलाही मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय.
Why E20 Petrol Dispute : E-20 पेट्रोलला विरोध का?
'E20 जनता पार्टी'च्या संस्थापकांनी आणि आंदोलकांनी आरोप केला आहे की, सरकारच्या 20 टक्के इथेनॉल मिश्रणामुळे जुन्या आणि नवीन वाहनांच्या इंजिनचे मोठे नुकसान होत आहे. वाहनांची मायलेज क्षमता कमालीची घटली असून, इंजिनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना समान किंवा अधिक किंमत मोजूनही कमी दर्जाचे इंधन दिले जात असल्याचा दावा या पक्षाकडून करण्यात येत आहे.
Demands Of E20 Janta Party : अशा आहेत मुख्य मागण्या
1. 100 % शुद्ध पेट्रोलचा पर्याय : पेट्रोल पंपांवर ग्राहकांना E20 ऐवजी 100 टक्के शुद्ध पेट्रोल (Unblended Petrol) निवडण्याचा स्पष्ट आणि कायदेशीर पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा.
2. किमतीत सवलत : जर सरकार इथेनॉल मिश्रित इंधन (E20) विकत असेल, तर त्याचा उत्पादन खर्च कमी असल्याने ग्राहकांना ते स्वस्त दरात मिळाले पाहिजे.
3. पारदर्शक लेबलिंग : प्रत्येक इंधन पंपावर कोणत्या नोझलमध्ये किती टक्के इथेनॉल आहे, याचे स्पष्ट फलक लावले जावेत.
E20 Janta Party Inspiration From CJP Protest : सीजेपीच्या यशाचा प्रभाव
नीट पेपरफुटी प्रकरणात तरुण आणि विद्यार्थ्यांच्या 'कॉकरोच जनता पार्टीने' सरकारला नमवून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या होत्या. त्याच धर्तीवर आता E20 जनता पार्टीनेही जंतर-मंतरच्या आसपास आपले आंदोलन तीव्र केले आहे. देशातील करोडो वाहनधारकांच्या आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या खिशावर पडणारा हा थेट दरोडा असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा या नव्या पक्षाने दिला आहे.
ही बातमी वाचा:
