नवी दिल्ली: एर्नाकुलम-मुंबई दुरांतो एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाने चांगलाच हंगामा घातला. कारण की, प्रवाशाच्या आरोपानुसार, ट्रेनमध्ये दिलं जाणाऱ्या टॉमेटो सूपसाठी टॉयलेटचं पाणी वापरण्यात येत होतं.


 

याप्रकरणी कोझीकोड स्टेशनमास्तरकडे तक्रार केल्यानंतर ट्रेनमधील लोकांनी जोरदार हंगामा केला. त्यामुळे 15 मिनिटं रेल्वे थांबविण्यात आली होती.

 

मीडिया रिपोर्टनुसार, ट्रेनच्या शौचालयामधून कॅन्टीन कर्मचारी पाणी भरुन ते टॉमेटो सूपसाठी वापरत असल्याचं एका प्रवाशानं पाहिलं. त्यानंतर त्याने याबाबत स्टेशन मास्तरकडे तक्रार केली. स्टेशन मास्तरांनी कारवाईचं आश्वासन दिलं. ही घटना रविवारची आहे.

 

दुरांतो एक्सप्रेसमधील या घटनेने नाराज प्रवाशांनी सोशल मीडियावर सरकारच्या 'स्वच्छ भारत' मिशनवर निशाणा साधला.