नवी दिल्ली : पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानानं बनवलेल्या 'पिनाका' रॉकेटची शुक्रवारी यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. (DRDO successfully test fires Enhanced Pinaka Rocket Check details ) डीआरडीओने ओडिशाच्या समुद्रकिनारी असलेल्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये (आयटीआर) ही चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान सलग 25 रॉकेट सोडले गेले आणि ते सर्व रॉकेट्स लक्ष्य भेदण्यात देखील यशस्वी ठरले. हे रॉकेट 45 किमीपर्यंत टार्गेट उद्धवस्त करण्यात यशस्वी ठरले आहे. या यशस्वी चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे.
पुण्यातील अर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅबिलिशमेंटन (एआरडीई) आणि हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरटरीने (एचईएमआरएल) ही रॉकेट यंत्रणा विकसित केली आहे. त्यासाठी नागपूरच्या इकॉनॉमिक एक्सप्लॉझिव्हने उत्पादनासाठी सहकार्य केले आहे. अधिक टप्प्यावर मारा करण्याचे सामर्थ्य वाढविण्यासाठी पिनाका रॉकेट विकसित केलं आहे.
पिनाका रॉकेटची लाँचिंग यंत्रणा ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार केली आहे. पिनाका डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑफ डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑरगायनेझशन ही एलअँडटीच्या मालकीची आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आर्टिलरी रॉकेट सिस्टममध्ये अपडेट सुरु ठेवलं होतं. 24 आणि 25 जून 2021 रोजी मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर (एमबीआरएल) द्वारे विकसित केलेल्या या पिनाका विस्तारित रेंजच्या रॉकेटची यशस्वी चाचणी केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या विकसित केलेल्या पिनाका रॉकेटच्या यशस्वी चाचणीनंतर डीआरडीओचं अभिनंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी या मोहिमेत सहभागी सर्वाचं अभिनंदन करत कौतुक केलं आहे.