अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादच्या चांदखेडा परिसरात प्रजापती कुटुंबातील दोन लहान मुलींच्या मृत्यूनंतर सुरुवातीला डोशाच्या पिठामुळे विषबाधा (Gujarat Ahmedabad Crime News) झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र फॉरेन्सिक तपासाच्या प्राथमिक निष्कर्षांनंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. आता तपास यंत्रणा अन्नातून विषबाधेपेक्षा (Gujarat Ahmedabad Crime News) सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नाच्या शक्यतेकडे अधिक गांभीर्याने पाहत आहे. घरातून सापडलेल्या एका डायरीतील नोंदींमुळेही संशय अधिक गडद झाला आहे.(Gujarat Ahmedabad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांची राहा आणि चार वर्षांची मिश्री यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अंतिम फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. मात्र या घटनेतून बचावलेल्या पालकांच्या रक्त तपासणीत ‘अॅल्युमिनियम फॉस्फेट’ आणि ‘झिंक’चे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे, जे गंभीर बाब मानली जात आहे. सुरुवातीला स्थानिक डेअरीमधून आणलेल्या पिठापासून बनवलेल्या डोशामुळे ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त झाली होती. परंतु त्याच पिठाचा वापर केलेल्या इतर कोणत्याही ग्राहकाला त्रास झाल्याची नोंद नसल्याने हा संशय कमी झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलत इतर शक्यतांचा शोध सुरू केला आहे.(Gujarat Ahmedabad Crime News)

दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विमल प्रजापती आणि त्यांची पत्नी भावना यांच्या रक्तात आढळलेल्या रासायनिक घटकांचा त्यांच्या मुलींच्या मृत्यूशी संबंध आहे का, याचा तपास तज्ज्ञांकडून केला जात आहे. घरातून जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुनेही तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. 

Dosa Batter Crime news:  मंदिरात नवस फेडण्याचा उल्लेख

या प्रकरणातील तपासादरम्यान कुटुंबाच्या घरातून एक पर्सनल डायरी सापडली आहे. त्यातील नोंदींमध्ये मुलगा होण्याची तीव्र इच्छा दिसून येते. मुलगा झाल्यावर मंदिरात जाऊन नवस फेडण्याचाही उल्लेख आहे. या नोंदी या वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच प्रजापती दाम्पत्याच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मापूर्वी लिहिल्या गेल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे.(Gujarat Ahmedabad Crime News)

पोलिसांनी अद्याप कोणताही थेट निष्कर्ष काढलेला नसला तरी, या घटनेशी काही मानसिक किंवा कौटुंबिक घटक जोडलेले आहेत का, याचा ते तपास करत आहेत. मात्र, तपासादरम्यान घरातून सापडलेल्या डायरीत मुलगा होण्याची तीव्र इच्छा व्यक्त केल्याचे दिसून आले. तसेच मुलगा झाल्यास मंदिरात नवस फेडण्याचा उल्लेखही नोंदींमध्ये आढळून आला आहे. या बाबीमुळे प्रकरणाला मानसिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.

याशिवाय, घरातून ‘अॅल्युमिनियम फॉस्फाइड’युक्त कीटकनाशकाची पाकिटेही जप्त करण्यात आली आहेत. त्यांचा या घटनेशी काही संबंध आहे का, याची तपासणी सुरू आहे. पोलिसांनी अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष काढलेला नसून अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले आहे.