Donald Trump : जागतिक बाजारपेठेच्या दृष्टीनं मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेकडून (America) चीनच्या (China) वस्तूंवर 104 टक्के आयात कर लादला आहे. येत्या 9 एप्रिलपासून अतिरिक्त कर वसूल केला जाणार असल्याची घोषणा व्हाईट हाऊसकडून करण्यात आली आहे. चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारचा अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं आता चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्धाचे ढग दिसू लागलेत. जगातील इतर देशांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या करवाढीस जशास तसे प्रत्युत्तर देत चीनने कर लादल्यामुळे व्यापार युद्ध भडकले आहे. त्यातच चीनने ही करवाढ मागे न घेतल्यास त्यांच्यावर आणखी 50 टक्के कर लादू असा इशारा ट्रम्प यांनी सोमवारी दिला होता. चीनने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशाऱ्याचा निषेध करत हे अतिरिक्त 50 टक्के शुल्क म्हणजे ‘ब्लॅकमेल’ असल्याचे म्हटले होते. जर दोन्ही देशांनी यावर तोडगा काढला नाही आणि ट्रम्प त्यांच्या योजनांना चिकटून राहिले, तर या वर्षी अमेरिकेत आयात केलेल्या चिनी वस्तूंवर एकूण नवीन शुल्क 104 टक्क्यांवर जाऊ शकते असे सांगण्यात आले होते. यामुळं व्यापार युद्ध वाढू शकते ज्यामुळे महामारीनंतर आधीच सर्वात जास्त झालेल्या नुकसानात भर पडण्याची शक्यता होती. अखेर ट्रम्प सरकारं 104 टक्के आयात कर लादला आहे.
युरोपियन कमिशनही ट्रम्प यांना टक्कर देण्यासाठी सज्ज
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ज्या प्रकारे टॅरिफ वॉर सुरू केले आहे, त्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. पण जगात असे काही देश आहेत ज्यांनी ट्रम्प यांना टक्कर देण्याची योजना आखली आहे. चीनने यापूर्वीच अमेरिकेला या प्रकरणात आरसा दाखवला असून आता 27 देशांचा संपूर्ण गट म्हणजेच युरोपियन कमिशनही ट्रम्प यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. 16 मेपासून काही वस्तूंवरील शुल्क लागू होईल, असे एजन्सीने कागदपत्रांना सांगितले आहे.
चिनी वस्तूंवर एकूण 104 टक्के शुल्क लागू
चीनने अमेरिकेवर 34 टक्के प्रत्युत्तरात्मक कर लादल्यानंतर अवघ्या 48 तासांत ट्रम्प यांनी 50 टक्के कर लादण्याचे हे विधान केले होते. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी चीनवर 34 टक्के शुल्क लादले होते. जे चीनने तात्काळ मागे घेत प्रत्युत्तर म्हणून तेच शुल्क अमेरिकेवर लादले होते. आता ट्रम्प यांनी त्यात आणखी 50 टक्के वाढवले आहे. ज्यामुळे चीनवरील अमेरिकेचे एकूण शुल्क 84 टक्क्यांवर गेले आहे. याव्यतिरिक्त, ट्रम्प प्रशासनाने आधीच लागू असलेल्या 20 टक्के जागतिक शुल्काची देखील भर घातली आहे, ज्यामुळे एकूणच चिनी वस्तूंवर 104 टक्के शुल्क लागू झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
