Dhar Bhojshala Judgement : मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा-कमाल मौला संकुलाबाबत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठानं हा परिसर हिंदू मंदिर असल्याचं स्पष्ट केलं आहे. न्यायालयाने हा परिसर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर आणि संस्कृत शिक्षणाचे प्राचीन केंद्र असल्याचं नमूद केले. हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) यांच्या वैज्ञानिक सर्वेक्षण अहवालावर विश्वास व्यक्त केला. पुरातत्त्वशास्त्र हे विज्ञान असून त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांवर न्यायालय अवलंबून राहू शकतं, असंही न्यायालयाने स्पष्ट केले.

Continues below advertisement

High Court Verdict Dhar Bhojshala : हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार कायम

न्यायालयाने हिंदूंना भोजशाळेत पूजा करण्याचा अधिकार कायम ठेवला आहे. तसेच ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व असलेल्या वास्तूंचे संरक्षण करणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं. श्रद्धाळूंना मूलभूत सुविधा पुरवण्याची आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.

Muslim Community Dhar Bhojshala : मशिदीसाठी स्वतंत्र जागेचा पर्याय

मुस्लिम समाजाला धार जिल्ह्यात मशिदीसाठी स्वतंत्र जागा मिळावी यासाठी राज्य सरकारकडे अर्ज करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. यामुळे दोन्ही समूदायांच्या धार्मिक भावनांचा विचार करण्याचा प्रयत्न न्यायालयानं केल्याचं मानलं जात आहे.

Continues below advertisement

ASI Survey Report Dhar Bhojshala : वैज्ञानिक अहवालावर शिक्कामोर्तब

2024 मध्ये ASI ने 98 दिवसांचे वैज्ञानिक सर्वेक्षण करून विस्तृत अहवाल न्यायालयात सादर केला होता. या अहवालात परिसरात प्राचीन मंदिराचे अवशेष असल्याचं नमूद करण्यात आलं होते. न्यायालयाने या अहवालाला महत्त्वपूर्ण आधार मानत अंतिम निर्णय दिला.

Dhar Bhojshala History : राजा भोजांच्या काळातील ज्ञानपीठ

इतिहासानुसार, परमार वंशातील राजा भोज यांनी 11व्या शतकात येथे संस्कृत शिक्षणासाठी महाविद्यालय स्थापन केले होते. हेच केंद्र पुढे ‘भोजशाळा’ म्हणून प्रसिद्ध झाले. हिंदू समाज या स्थळाला देवी सरस्वतीचे मंदिर मानतो, तर मुस्लिम समाज याला कमाल मौला मशीद म्हणून संबोधतो.

What Is Dhar Bhojshala Case : नेमकं काय प्रकरण?

भोजशाळा प्रकरणाचा न्यायालयीन खटला साधारणपणे 2003 पासून जास्त वेगाने पुढे गेला. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूंनी पूजा आणि नमाज अधिकारांबाबत विविध याचिका दाखल केल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठात सुनावणीला आले होते.

ब्रिटिश काळातही भोजशाळेच्या धार्मिक स्वरूपावरून वाद होते. १९३५ मध्ये ब्रिटिश प्रशासनाने हिंदू आणि मुस्लिम समुदायांसाठी वेगवेगळे दिवस निश्चित केले होते. स्वातंत्र्यानंतरही हा वाद कायम राहिला.

1990 च्या दशकात हा मुद्दा पुन्हा तीव्र झाला आणि नंतर न्यायालयीन लढाई अधिक गंभीर झाली. वसंत पंचमीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही समुदायांना वेगवेगळ्या वेळेत पूजा आणि नमाज अदा करण्याची परवानगी दिली होती.

Court Order Impact : दीर्घकालीन वादावर मोठा निकाल

अनेक दशकांपासून सुरू असलेल्या धार्मिक आणि कायदेशीर वादावर या निर्णयामुळे मोठा टप्पा गाठला गेला आहे. या निर्णयानंतर भोजशाळा परिसराच्या व्यवस्थापनाबाबत केंद्र सरकार आणि ASI पुढील निर्णय घेणार आहेत.

ही बातमी वाचा: