High Court Verdict Dhar Bhojshala : मध्य प्रदेशातील ऐतिहासिक आणि संवेदनशील ठरलेल्या धार भोजशाळा प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाच्या निर्णयानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) भोजशाळेबाबतचे सर्व पूर्वीचे आदेश तात्काळ प्रभावाने रद्द केले आहेत. या नव्या आदेशानुसार हिंदू समाजाला भोजशाळा परिसरात देवी वाग्देवी अर्थात माता सरस्वतीची कोणत्याही अडथळ्याविना पूजा-अर्चना करण्याचा अधिकार मिळाला आहे.

Continues below advertisement

धार भोजशाळा ही संस्कृत अध्ययनाचे प्राचीन केंद्र आणि देवी सरस्वतीला समर्पित मंदिर असल्याचं न्यायालयानं नमूद केलं होतं. त्यानुसार एएसआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी करत पूजा, अध्ययन आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी परिसरात निर्बंधमुक्त प्रवेशाची परवानगी दिली आहे. मात्र, हा परिसर 'प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळ व अवशेष अधिनियम 1958' (AMASR Act 1958) अंतर्गत संरक्षित स्मारक म्हणून कायम राहणार आहे.

ASI Order Dhar Bhojshala : एएसआयने सर्व जुने आदेश रद्द केले

एएसआयने स्पष्ट केले आहे की धार भोजशाळा परिसरासंदर्भात यापूर्वी जारी करण्यात आलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नवीन नियमांनुसारच परिसराचे व्यवस्थापन आणि धार्मिक उपक्रमांचे नियोजन केले जाणार आहे.

Continues below advertisement

Saraswati Puja Rights : सरस्वती पूजेसाठी निर्बंधमुक्त प्रवेश

नव्या आदेशानुसार हिंदू समाजाला पारंपरिक पद्धतीने देवी सरस्वतीची पूजा करण्यासाठी भोजशाळा परिसरात कोणत्याही अडथळ्याविना प्रवेश मिळणार आहे. यामुळे दीर्घकाळ सुरू असलेल्या वादाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.

Dhar Bhojshala Protected Monument : संरक्षित स्मारकाचा दर्जा कायम

पूजेला परवानगी देण्यात आली असली तरी भोजशाळेचा संरक्षित स्मारकाचा दर्जा कायम राहणार आहे. स्मारकाच्या संरक्षणासाठी एएसआय आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे नियम निश्चित करणार आहेत.

Entry Timing Dhar Bhojshala: प्रवेशाची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार

भक्त आणि पर्यटकांसाठी प्रवेशाची वेळ संबंधित अधीक्षक पुरातत्त्वज्ञ आणि जिल्हा प्रशासनाच्या सल्ल्यानुसार निश्चित केली जाणार आहे. पूजा आणि अध्ययनाशी संबंधित सर्व उपक्रम स्मारकाच्या संरक्षणाच्या दृष्टीने नियंत्रित केले जातील.

इतिहासानुसार, परमार वंशातील राजा भोज यांनी 11व्या शतकात येथे संस्कृत शिक्षणासाठी महाविद्यालय स्थापन केले होते. हेच केंद्र पुढे ‘भोजशाळा’ म्हणून प्रसिद्ध झाले. हिंदू समाज या स्थळाला देवी सरस्वतीचे मंदिर मानतो, तर मुस्लिम समाज याला कमाल मौला मशीद म्हणून संबोधतो

ही बातमी वाचा :