नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे मोदी सरकारवर हल्ले सुरुच आहेत.

नोटबंदीच्या परिणामांची शहानिशा न करताच जीएसटी लागू करण्याची घाई केली, असा हल्लाबोल यशवंत सिन्हा यांनी आज केला.

सिन्हा यांनी काल नोटाबंदी म्हणजे मंदीच्या आगीत तेल ओतण्यासारखं असल्याचं म्हणत मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. त्यानंतर आज त्यांनी जीएसटीवरुन सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

शहानिशा न करताच जीएसटी लागू

सिन्हा म्हणाले, “मोदी सरकारमध्ये पूर्ण गतीनिशी कामं होत नाही. नोटबंदीच्या परिणामांची शहानिशा न करताच जीएसटी लागू केला. त्यामुळे सध्याच्या स्थितीसाठी मागच्या सरकारला दोषी ठरवता येणार नाही”.

सरकार एकापाठोपाठ एक असे झटके देत आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तर विकासदर सातत्याने घटत आहे, असं सिन्हा म्हणाले.

मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल : यशवंत सिन्हा

“सरकारने आधी नोटाबंदीचा झटका दिला, त्या झटक्यातून सावरण्यापूर्वीच जीएसटीचा दणका दिला. जर 1 जुलैऐवजी 1 ऑक्टोबरपासून जीएसटी लागू केला असता, तर कोणतं आभाळं कोसळलं असतं? तोपर्यंत नोटाबंदीच्या झटक्यातून सावरण्यासाठी वेळ मिळाला असता आणि त्यामुळे जीएसटीचा ताण तितकासा जाणवला नसता”, असंही सिन्हा यांनी नमूद केलं.

इतकंच नाही तर मी जीएसटीची रचन आणि टॅक्स दर याबाबत बोलतच नाही, असंही सिन्हा म्हणाले.

यापूर्वी राहुल गांधी यांनी जीएसटीच्या टॅक्स दरावरुन सरकारवर टीका केली होती.

संबंधित बातम्या

विकास वेडा झाला आहे, 'सामना'तून टीकास्त्र यशवंत सिन्हांना पाठिंबा

नोटाबंदीवरुन यशवंत सिन्हांचा घणाघात, आता पुत्र जयंत सिन्हांचं उत्तर

नोटाबंदीवरुन यशवंत सिन्हांचा घणाघात, आता पुत्र जयंत सिन्हांचं उत्तर

विकासाला काय झालं?, राहुल गांधींकडून मोदींच्या विकास मॉडेलची खिल्ली

मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल : यशवंत सिन्हा

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचं जगाने मान्य केलंय : राजनाथ सिंह