Shraddha Murder Case: मुंबईतल्या वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मुख्य आरोपी अफताब पूनावाला याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तपासादरम्यान अफताबनं पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे. श्रद्धा वालकरच्या शरिराचे तुकडे करण्यासाठी अनेक धारधार शस्त्रांचा वापर केला होता. दरम्यान, मागील काही दिवसांत पोलिसांनी पाच चाकू ताब्यात घेतले होते. त्या चाकूंना पोलिसांनी फॉरेंसिक टीमकडे पाठवण्यात आले आहे. 


अफताबच्या फ्लॅटमधून अनेक धारधार चाकू जप्त करण्यात आले आहेत. या धारधार चाकूंची लांबी पाच ते सहा इंच इतकी आहे, या चाकूंना  तपासासाठी पाठवण्यात आले आहे. हे चाकू अफताबने श्रद्धा वालकरच्या शरिराचे तुकडे करण्यासाठी वापरले का? हे फॉरेंसिक टीमच सांगू शकते, असे पोलिसातील सुत्रांनी सांगितलं. दरम्यान, अफताब पूनावाला याची आज पॉलिग्राफ टेस्टही घेण्यात आली आहे. 


दक्षिण दिल्लीच्या महरौली परिसरातील फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरची हत्या केल्याच्या आरोपाखील 12 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी अफताब पूनावाला याला बेड्या ठोकल्या होत्या. अफताबने श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला, त्यानंतर शरिराचे 35 तुकडे केले होते असे पोलिसांनी सांगितलं. श्रद्धाच्या शरिराचे तुकडे कडून फ्रिजमध्ये ठेवले होते, तीन आठवडे तो दिल्लीमध्ये वेगवेगळ्या भागात हे तुकडे फेकत होता, असेही पोलिसांनी सांगितलं.  दरम्यान, आफताब पूनावाला तपासात पोलिसांना सहकार्य करत नसल्याने दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुरावे जमा करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती आहे. कोर्टात हे पुरावे अधिक मदतशीर कसे ठरतील यासाठी पोलिसांकडून चाचपणी सुरू आहे. श्रद्धाच्या हत्येबाबत माहिती गोळा करत असताना पोलिसांना मृतदेहाचे अवशेष गोळा करणे कठीण जात आहे. शिवाय आफताब देखील वारंवार आपले जबाब बदलत आहे. त्यामुळे पोलिसांना पुरावे गोळा करण्यात आणि तपास करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. 


पोलिसांकडे पुरावे काय?


सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाची हत्या करून त्याचे तुकडे केल्यानंतर रक्ताने माखलेले बाथरूम धुण्यासाठी आफताबने अमाप पाण्याचा वापर केला. दिल्लीमध्ये प्रत्येक घराला वीस हजार लिटर पाणी मोफत आहे. त्यामुळे दिल्लीतल्या बहुतांश घरांमध्ये पाण्याचे बिल येत नाही, पण गेल्या पाच महिन्यांमध्ये आत्ताच्या फ्लॅटमध्ये पाण्याचे बिल तीनशे रुपये आलं होतं. म्हणजे आफताबने जे पाणी वापरलं तेच त्याच्याविरोधात पुरावा बनले आहे.  आता पोलिसांना केवळ आफताबने आत्तापर्यंत ज्या बाबी सांगितल्या त्यामध्ये श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावला होता पासून ते दिल्लीतील कोण कोणत्या भागात श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकले ते नार्कोटेस्टमुळे उघड व्हायला मदत होणार आहे आणि त्याच्याच मदतीने अफताबला लवकरात लवकर फाशीच्या तक्त्यापर्यंत न्यायला मदत होणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Shraddha Murder: "आफताब मला मारुन टाकेल आणि तुकडे करुन फेकून देईल..." ; श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच पोलिसांना दिलेली माहिती