Delhi Zurich Flight Fire News: दिल्ली विमानतळावर आज (रविवारी) सकाळी एक मोठा अपघात टळलाय. दिल्लीहून स्वित्झर्लंडच्या (Switzerland) झ्युरिक (Zurich) येथे जाणारे स्विस एअरचे विमान SWR146 (SWISS International Air Lines) टेकऑफच्या वेळी इंजिन निकामी (Swiss Air Flight) झाल्यामुळे रद्द करण्यात आले. विमानाच्या डाव्या पंखातून अचानक धूर येत असल्याचे निदर्शनातआले. तसेच उजव्या लँडिंग गिअरजवळ आग लागल्याचीदेखीलप्राथमिकमाहितीआहे. याघटनेमुळे दिल्ली विमानतळावर एकचखळबळउडाली. मात्रवेळीचहिदुर्घटनालक्षातआल्यानेमोठीदुर्घटनाटळलीआहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे, दिल्ली विमानतळाची रनवे 28 बऱ्याच काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, विमानातील सर्व प्रवाशांना आपत्कालीन स्लाईड्सच्या साहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचीमाहितीआहे. तर या विमानात ऐकून 232 प्रवासी आणि 13 कर्मचारी होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, विमानतळ प्रशासनाने तात्काळ संपूर्ण परिसरात आणीबाणी जाहीर केली.
Delhi Airport News : खबरदारीचा उपाय म्हणून रनवे 28 बंद, विमानसेवा तात्पुरती विस्कळीत
या घटनेनंतर, खबरदारीचा उपाय म्हणून रनवे 28 बंद करण्यात आला, ज्यामुळे विमानसेवा तात्पुरती विस्कळीत झाली. किंबहुना, विमानतळ कर्मचारी आणि बचाव पथकांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली. विमानात 232 प्रवासी आणि 13 कर्मचारी होते. सर्व प्रवाशांना आपत्कालीन स्लाईडद्वारे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्रयावेळीप्रवाशांमध्ये काही प्रमाणात घबराट निर्माण झाली असली तरी, वेळीच कारवाई केल्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.
Delhi Zurich Flight Fire News: इंजिन निकामी होण्याचे आणि आग लागण्याचे नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना बाहेर काढताना चार जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. इंजिन निकामी होण्याचे आणि आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी एअरलाइन आणि हवाई वाहतूक प्राधिकरणाने तपास सुरू केला आहे. प्राथमिकदृष्ट्या, हा एक तांत्रिक बिघाड असल्याचे मानले जात आहे, परंतु सविस्तर अहवाल मिळाल्यानंतरच हि परिस्थिती स्पष्ट होईल.
विमानातील प्रवाशांनी मृत्यूला कसे तोंड दिले?
फ्लाइट LX147 म्हणून उड्डाणासाठी पूर्णपणे तयार असलेल्या एअरबस A330 विमानात 232 प्रवासी (चार लहान मुलांसह) आणि कर्मचारी होते.
पहाटे सुमारे 1.08 वाजता विमान रनवे 28 च्या दिशेने वेगाने येत होते.
पायलट उड्डाणासाठी पूर्णपणे तयार होते, तेव्हा एक तांत्रिक समस्या लक्षात आली.
इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर आगीच्या ज्वाला दिसू लागल्या, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, कर्मचाऱ्यांनी उड्डाण रद्द करण्यापूर्वी विमानाने 104 नॉट्सचा वेग गाठला होता.
प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना आपत्कालीन स्लाईड्सच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.
हे सुद्धा वाचा
