जर पाकिस्ताननं 227 प्रवासी असलेलं इंडिगोचं विमान पाडलं असतं तर.... DGCA नं 'त्या' विमानातील दोन्ही पायलट बद्दल घेतला मोठा निर्णय
Delhi-Srinagar Indigo Flight: पायलटनं खराब हवामानापासून वाचण्यासाठी लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी मागितली होती.

Delhi-Srinagar Indigo Flight नवी दिल्ली : दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला खराब हवामान आणि गारपीट झाल्यानं फटका बसला होता. हा प्रकार 21 मे रोजी घडला होता. विमान अमृतसरवरुन जात असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचा अंदाज पायलटला आला होता. पायलटनं लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी मागितली होती, मात्र पाकिस्तानकडून नकार देण्यात आला होता. नागरी उड्डाण प्राधिकरणानं या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत दोन्ही पायलट विमान उडवू शकणार नाहीत.
तर पाकिस्तानवर खटला चालवणं अवघड झालं असतं...
पाकिस्ताननं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय विमानांना त्यांची हवाई हद्द वापरण्यास मनाई केली आहे. पाकिस्ताननं त्यासंदर्भात जारी केलेला नोटम 23 मे पर्यंत लागू आहे. विमानाच्या दोन्ही पायलटला नोटम संदर्भात माहिती नव्हती का? नोटम दरम्यान जर पाकिस्ताननं विमान पाडलं असतं तर आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार पाकिस्तानवर खटला चालवणं अवघड झालं असतं. पठाणकोट जवळ अमृतसर असूनही तिथं लँडिंगसाठी पायलटनं का प्रयत्न केला नाही? विमान हवेत ठेवण्यावर पायलट का ठाम राहिले, असा सवाल केला जात आहे?
पठाणकोट जवळ खराब हवामान
दिल्ली-श्रीनगर विमानाला पठाणकोट जवळ गारपीट आणि वेगवान वाऱ्याचा सामना करावा लागला. मात्र, भारतीय हवाई दलानं दिल्ली-श्रीनगर विमानाला श्रीनगर विमानावर सुरक्षित लँड करण्यात आलं. डीजीसीएनं म्हटलं की पायलटकडून खराब हवामानामुळं मार्ग बदलण्याची मंजुरी मागण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून लाहोर हवाई हद्दीत जाण्याची परवानगी दिली गेली नव्हती.
विमानात होते तृणमूल काँग्रेसचे खासदार
डीजीसीएनुसार, पायलटकडून पुन्हा दिल्लीकडे परतण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तुफानी वादळांजवळ असताना त्यांनी खराब हवामानातून पुढं जाण्यासंदर्भात निर्णय घेतला. तृणमूल काँग्रेसचे पात खासदार त्या विमानात होते. डेरेक ओ ब्रायन, नदीमुल हक, सागरिका घोष, मानस भुनिया आणि ममता ठाकूर यांचा सहभाग होता.



















