Delhi Red Fort Bomb Blast :नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोट प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात हरियाणातील गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. दिल्लीमध्ये ज्या i20 कारचा स्फोट झाला ती कार या मोहम्मद सलमानच्या नावावर रजिस्टर असल्याची माहिती समोर आली. त्याचवेळी ही कार त्याने दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याचंही समोर आलं आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशनजळ सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला हा स्फोट सिलेंडरचा असल्याची चर्चा सुरू होती. मात्र नंतर यामागे काही घातपात असल्याचा संशय बळावला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला. आता या स्फोटाचा आणि फरिदाबादच्या कारवाईचे कनेक्शन असल्याचंही समोर येत आहे.

Delhi Blast News : गाडीच्या मूळ मालकाला अटक

दिल्लीमधील स्फोटामध्ये ज्या i20 कारचा वापर करण्यात आला ती कार हरियाणातील मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलमानला अटक केली. मात्र त्यानंतर पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली.

मोहम्मद सलमानने त्याची i20 कार ही नदीम नावाच्या एका व्यक्तीला विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा व्यवहार ओखला या ठिकाणी झाला होता. त्यामुळे पोलीस आता त्या नदीम नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Red Fort Bomb Blast : दहशतवादी स्फोट असल्याचं स्पष्ट

या स्फोटामागील सर्व शक्यता तपासून पाहण्यात येत आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिली. लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात ही कार येऊन थांबली आणि त्याचा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच याचे कनेक्शन फरिदाबाद मधील कारवाईशी असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट होत आहे.

Faridabad Terrorist Arrest : फरिदाबादमध्ये सात दहशतवाद्यांना अटक

दिल्लीतील स्फोटामुळे आज सकाळीच फरीदाबादमध्ये झालेल्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी सकाळी फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. तसंच 350 किलो स्फोटकही जप्त करण्यात आले आहेत. फरीदाबाद मेडिकल कॉलेज दिल्लीतील स्फोटाच्या स्थळापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे.

ही बातमी वाचा: