Swatantra Bhardwaj : स्वतंत्र भारद्वाज पोलिसांच्या ताब्यात, दिल्ली पोलिसांची उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये कारवाई,राजधानीत वेगवान घडामोडी, नेमकं प्रकरण काय?
Nishu Aazad : सीजेपी आंदोलक निशू आझाद हिचे वडील संजय आझाद यांना मारहाण केल्या प्रकरणी स्वतंत्र भारद्वाज याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नवी दिल्ली : सीजेपी आंदोलक निशू आझाद हिचे वडील संजय कुमार यांच्यावर 20 जुलै रोजी हल्ला करणाऱ्या आरोपी स्वतंत्र भारद्वाज याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथून स्वतंत्र भारद्वाज याला 4 सप्टेंबर म्हणजे आज ताब्यात घेतलं. दिल्ली पोलिसांनी भारद्वाजला स्थानिक पोलीस स्टेशनला नेलं आहे, तिथं पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे.निशू आझाद हिनं काल एक व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. राहुल गांधी यांनी देखील त्या पोस्ट करत उत्तर देत, तिच्यासोबत असल्याचं म्हटलं होतं.
दिल्लीत वेगवान घडामोडी
स्वतंत्र भारद्वाजनं एका पॉडकास्टमध्ये संजय कुमार यांच्यावरील हल्ल्याचा उल्लेख केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच कॉकरोच जनता पार्टी, काँग्रेस, आझाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षाचे नेते आक्रमक झाले होते. सीजेपीचे आशुतोष रांका, सौरव दास आणि काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे विनोद जाखड, खासदार चंद्रशेखर आजाद यांच्यासह इतर कार्यकर्ते नवी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचले आणि त्यांनी स्वतंत्र भारद्वाज याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. या नेत्यांनी दिल्ली पोलिसांसोबत 2 तास चर्चा केली. यानंतर आरोपीवर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. संजय कुमार यांची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी केली जाईल. वैद्यकीय रिपोर्टच्या आधारावर या प्रकरणात हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला जाईल, असं ठरवण्यात आलं. 72 तासांच्या कालावधीत स्वतंत्र भारद्वाज याला अटक केली जाईल असं देखील पोलिसांनी सांगितलं.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देखील एक पोस्ट केली आहे. दिल्ली पोलिसांनी संबंधित आरोपी विरोधात एफआयआर दाखल केली आहे, त्याला 72 तासांमध्ये अटक केली जाईल, असं म्हटलं. पोलिसांसमोर झालेल्या गुन्ह्याप्रकरणी एफआयआर दाखल करायला दोन महिन्यांचा कालावधी लागला. पोलीस विभागाला सुधारण्याची गरज असल्याचं दीपके म्हणाले. सौरव दास यांनी देखील दिल्ली पोलिसांना सायंकाळ पर्यंतचा वेळ दिला आहे. पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली तर सायंकाळी पोलीस स्टेशनला घेराव घातला जाईल, असं म्हटलं.
स्वतंत्र भारद्वाज पॉडकास्टमध्ये काय म्हणालेला?
निशूच्या वडिलांचा डोक फोडलं, तुम्हाला माहिती आहे का यामध्ये कोणतं कलम लागतं, 307, हाफ मर्डर, डोक्यावर सात टाके होते. निशू पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत होती. स्वतंत्र दुसऱ्या दिवशी बाहेर होता, आम्ही तुरुंगात गेलो नाही, संपूर्ण जगाला माहिती पाहिजे, मी तुरुंगात गेलो नाही. आम्ही रात्रभर फिरत होतो, असं स्वतंत्र भारद्वाज त्या पॉडकास्टमध्ये म्हटलं.
Before You Go
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका























