Delhi Fire : दिल्लीमधील (Delhi) संस्कृती कोचिंग क्लासला (Coaching Class) आग लागल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. तर या आगीमधून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उडी मारुन आपला जीव वाचवला. दरम्यान अग्निशमन दलाच्या एकूण 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले असून बचावकार्य देखील करण्यात आले. परंतु विद्यार्थ्यांनी त्या आधीच दोरीच्या साहाय्याने उड्या मारुन आपला जीव वाचवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केला. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान यामध्ये सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे. 


अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, "सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झाली नाही." सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं देखील अग्निमशन दलाकडून सांगण्यात येत आहे. तसेच, अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचण्याआधीच काही विद्यार्थ्यांनी दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना थोडी दुखापत झाली आहे, असं देखील अग्निशमन दलाने सांगितलं आहे. 






विद्यार्थ्यांनी दोरीच्या साहाय्याने वाचवला जीव


माहितीनुसार, ही आग वीजेच्या मीटरमुळे लागली होती. या आगीमुळे संपूर्ण कोचिंग क्लासमध्ये धूर पसरला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दोरीच्या सहाय्याने खाली उड्या मारण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोरीच्या साहाय्याने उतराताना चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विजेच्या मीटरला आग लागल्यामुळे संपूर्ण इमारतीमध्ये धूर पसरला. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासच्या खिडक्यांमधून दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्यास सुरुवात केली. परंतु त्यानंतर अग्निशमन दलाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाने देखील तात्काळ ही आग आटोक्यात आणल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही.' 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Dehradun Suicide: तीन दिवसांपूर्वी दाम्पत्याची आत्महत्या, 6 दिवसांचं बाळ अन्न-पाण्याविना आई-वडिलांच्या मृतदेह शेजारी पडून; देहराडूनमधील हृदय हेलावणारी घटना