Malviya Nagar Restaurant Fire नवी दिल्ली : राजधानीदिल्लीतूनएकमोठीबातमीसमोरआलीआहे. दिल्लीच्या मालवीय नगर (Malviya Nagar) भागातील लेमन ग्रीन (Lomon Green Hotel) नावाच्या रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली आहे. ही आग (Malviya Nagar Restaurant Fire Accident) इतकी भीषण होती की या दुःखद घटनेत आतापर्यंत 20 जणांचा होरपळून मृत्यूझाल्याचीमाहितीसमोरआलीआहे. मिळालेल्यामाहितीनुसार, दिल्ली अग्निशमन दलाला (DFS) सकाळी 9.45 वाजता आगीची माहिती देण्यात आली. माहिती मिळताचपथकघटनास्थळीदाखल होऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी तळघरासह संपूर्ण इमारतीमधून अंदाजे 37 जणांना बाहेरकाढलं. मात्र त्यापैकी अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या, आत अडकलेल्या इतरांना शोधून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. (Delhi Malviya Nagar Fire Updates)
Malviya Nagar Restaurant Fire : हॉटेलमध्ये आगीचा प्रचंड लोट, परिस्थिती खूपच भयावह, आम्ही पाच जणांना....
दरम्यान, मालवीय नगर आगीचा प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रहिवासी असलेल्याएका तरुणानेयाघटनेबाबतअधिकमाहितीदेतानासांगितलंकि, "सकाळी सुमारे साडेनऊ वाजता आम्ही पाहिले की आग खूपच भडकली होती. त्यावेळी मी आणि माझा मित्र स्कूटरवर होतो. यावेळी संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती आणि लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून उड्या मारत होते. आम्ही सुमारे पाच जणांना उड्या मारताना पाहिले. एका व्यक्तीचा पायही मोडला होता. संपूर्ण रस्ता बंद झाला होता आणि घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. परिस्थिती खूपच भयावह होती." अशीमाहितीओमयातरुणानेदिलीआहे.
Delhi Fire Accident : लोकांनी खाली गाद्या अंथरल्या, एका लहान मुलासह तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली
दुसरीकडे, मालवीय नगर आगीचे प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रहिवासी शेर खान म्हणाले, "मी सकाळी दुकानाच्या दिशेने जात होतो. सुरुवातीला आग लहानशी होती, पण ती हळूहळू वाढत गेली. आग जसजशी तीव्र होत गेली, तसतसे वरच्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना खाली उतरण्याचा कोणताही मार्ग उरला नाही, असे वाटू लागले. लोकांनी खाली गाद्या अंथरल्या, त्यानंतर काही लोकांनी एका लहान मुलासह तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. एक महिला सांगत होती की तिचा पाय मोडला आहे. स्थानिक लोकांनी तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, जसजसा वेळ गेला तसतशी परिस्थिती अधिक गंभीर होत गेली."
Delhi Fire Accident : ठार झालेल्यांपैकी बहुतेक जण परदेशी नागरिक
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत 20 जणांचा यात मृत्यू झालाआहे. दरम्यान, मृतांचाआकडावाढण्याचीहीशक्यताआहे. तर ठार झालेल्यांपैकी बहुतेक जण परदेशी नागरिक होते. अशीदेखीलमाहितीआहे. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे, "आज सकाळी ८:४८ वाजता मालवीय नगर येथील 'फ्लोरीश स्टे बी अँड बी' मध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच, स्थानिक पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव, स्थलांतर आणि मदतकार्य सुरू केले. यावेळी 8 अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आगीवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवण्यात आले. पोलीस, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणांच्या समन्वित प्रयत्नांतून, 40 हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. अत्यंत दुःखाने आम्ही आपणास कळवत आहोत की, या दुःखद घटनेत 21 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. बचाव आणि शोधकार्य अजूनही सुरू असून, बाधितांना सर्वतोपरी मदत पुरवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा घटनास्थळी तैनात आहेत. अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर कळवण्यात येईल." असेहीयावेळीसांगण्यातआलंआहे.
