Delhi Fire news: दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी एका रेस्टॉरंटमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील लेमन ग्रीन हॉटेलला (Lemon Green Hotel) आग लागून ही भयंकर दुर्घटना घडली. सकाळी पावणेदहाच्या सुमारास अग्निशमन दलाला लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये (Lemon Green Restaurant) आग लागल्याची वर्दी मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत रेस्टॉरंटमध्ये आग (Fire) झपाट्याने पसरली होती. आग इतकी वेगाने पसरली की रेस्टॉरंटमधील लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे अनेकजण रेस्टॉरंट असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरच अडकून पडले होते. या रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक लोक तातडीन मदतीसाठी धावून आले. आग वेगाने पसरल्यामुळे रेस्टॉरंटमधील अनेकजण जीव वाचवण्यासाठी रेस्टॉरंटच्या खिडक्या आणि बालकनीमध्ये येऊन उभे होते. त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक लोकांनी गाद्या आणून जमिनीवर अंथरल्या. त्यानंतर अनेकांनी रेस्टॉरंटच्या हॉटेल आणि बालकनीतून खाली उड्या टाकल्या. (Delhi Hotel Fire news)
प्राथमिक तपासात लेमन हॉटेल अधिकृत परवाना नसताना चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर वीजपुरवठा विभागाने लेमन ग्रीन रेस्टॉरंटमधील वीजपुरवठा बंद केल्याने येथील आग नियंत्रणात आली. अग्निशमन दलाने आतापर्यंत जवळपास 37 लोकांना रेस्टॉरंटमधून बाहेर काढले आहे. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास रेस्टॉरंटमध्ये मोठी आग लागल्याचे स्थानिक लोकांच्या निदर्शनास आले. त्यावेळी रेस्टॉरंटमधील लोक वरुन खाली उड्या मारत होते. आमच्यासमोर पाच जणांना वरुन खाली उड्या टाकल्याचे एका प्रत्यदर्शीने सांगितले. माझ्यासमोरच उडी मारणाऱ्या एका व्यक्तीचा पाय तुटल्याचेही या प्रत्यदर्शीने सांगितले. या आगीत रेस्टॉरंट असलेल्या इमारतीचा परिसर पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
आणखी वाचा
