नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सफदरजंग परिसरात न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांनी गळफास घेऊन त्यांचं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे न्यायव्यवस्थेत आणि प्रशासनात खळबळ उडाल्याचं दिसतंय.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
Delhi Judge Incident Details : घरात गळफास घेतल्याची माहिती
ही घटना दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क परिसरात घडल्याचं समजतंय. पोलिसांना पीसीआर कॉल मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता, अमन कुमार शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ते कडकडडूमा कोर्टातील जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणात (DLSA) सचिव म्हणून कार्यरत होते.
Delhi Judge Investigation Update : पोलिसांकडून सखोल तपास सुरू
पोलिसांच्या प्राथमिक तपासात कोणत्याही कटकारस्थानाचे संकेत आढळले नाहीत. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
Delhi Judge Career Background : न्यायिक सेवेत 2021 पासून कार्यरत
अमन कुमार शर्मा यांनी 19 जून 2021 रोजी दिल्ली न्यायिक सेवेत प्रवेश केला होता. त्यांनी पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते.ऑक्टोबर 2025 पासून ते कडकडडूमा न्यायालयातील उत्तर-पूर्व जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणात पूर्णवेळ सचिव म्हणून कार्यरत होते.
या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.
ही बातमी वाचा:
