Crime News: तो मला संतुष्ट करू शकत नव्हता; माझे त्याच्या भावासोबत प्रेमसंबंध....; पतीची हत्या केली अन् आत्महत्या भासवलं, पोलिसांचा संशय, चौकशीत पत्नीची कबुली
Crime News: मंगळवारी दिल्लीत एका 29 वर्षीय महिलेला तिच्या पतीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. असा आरोप आहे की तिच्या 32 वर्षीय पतीची हत्या केल्यानंतर तिने ही घटना आत्महत्या असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.

दिल्ली: दिल्लीत काल (मंगळवारी) एका 29 वर्षीय महिलेला तिच्या पतीची हत्या केल्याबद्दल पोलिसांनी तिला अटक केली आहे. या महिलेवर असा आरोप आहे की, तिने तिच्या 32 वर्षीय पतीची हत्या केल्यानंतर ती आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी संध्याकाळी दिल्लीतील निहाल विहार परिसरात घडली. नंतर, जेव्हा पोलिसांनी पत्नीच्या फोनवरील हिस्ट्री तपासली तेव्हा 'व्यक्तीला मारण्याच्या पद्धतीचा' शोध घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. फरजाना खान नावाच्या महिलेने चौकशीदरम्यान कबूल केले की, तिने तिचा पती मोहम्मद शाहिद उर्फ इरफान याची हत्या केली कारण ती या नात्यात खूश नव्हती
नवऱ्याचे चुलत भावासोबत प्रेमसंबंध
फरजानाने चौकशीवेळी पोलिसांना असेही सांगितले की, शाहीद तिला शारिरीक सुख देऊ शकत नव्हता. याशिवाय, तो कर्जबाजारी होता आणि ऑनलाइन जुगार खेळायचा. फरजानाने असेही उघड केले की, तिचे त्याच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पती-पत्नी बरेलीचे रहिवासी होते.
शाहिदने कर्जामुळे आत्महत्या केली
रविवारी संध्याकाळी, संजय गांधी रुग्णालयातून पोलिसांना फोन आला की एका व्यक्तीला मृत अवस्थेत आणण्यात आले आहे. शाहिदचा मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचलेल्या त्याच्या भावाने पोलिसांना सांगितले की, शाहिदने कर्जामुळे आत्महत्या केली आहे. पण त्याच्या शरीरावर तीन जखमा पाहून पोलिसांना संशय आला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'जुगाराशी संबंधित कर्जामुळे तो तणावाखाली होता आणि त्याने स्वतःवर चाकूने वार केले.' पण सोमवारी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ती हत्या असल्याचे उघड झाले. डॉक्टरांनी सांगितले की शरीरावर ज्या प्रकारच्या जखमा आहेत त्या स्व:ता केलेल्या नाहीत.
चॅट हिस्ट्री कशी डिलीट करायची हे देखील शोधले
संशय वाढत असताना पोलिसांनी या मृत व्यक्तीच्या पत्नीचा फोन तपासला. त्यावेळी पोलिसांनी तिला सांगितले की, 'इंटरनेटवरील सर्च हिस्ट्रीमध्ये असे आढळले की 'झोपेच्या गोळ्या (सल्फा) देऊन एखाद्याला कसे मारायचे' शोधले गेले आहे. याशिवाय, चॅट हिस्ट्री कशी डिलीट करायची हे देखील शोधले गेलेले आहे', जेव्हा फरजानला हे पुरावे तिच्यासमोर ठेवून चौकशी करण्यात आली तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला.
शारीरिक सुखाचा अभाव आणि आर्थिक परिस्थितीमुळे...
फरजाना म्हणाली की, ती या लग्नामुळे खूश नव्हती. शारीरिक सुखाचा अभाव आणि आर्थिक परिस्थिती दोन्हीमुळे ती पतीसोबत सुखी नव्हती. तिने असेही सांगितले की, तिचे तिच्या पतीच्या बरेली येथे राहणाऱ्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. मंगळवारी फरजानाला अटक करण्यात आली आणि पुढील तपास सुरू आहे.
























