Delhi Bomb Blast Who is Doctor Umar: दिल्लीच्या लालकिल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण कार स्फोटात (Delhi Bomb Blast) 12 जणांचा मृत्यू आणि 20 हून अधिक लोक जखमी झाले आहे. या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे. या प्रकरणात आता पहिले छायाचित्र समोर आले असून ज्यात संशयित मोहम्मद उमर हा हुंडई i-20 कार चालवताना दिसत आहे. यानंतर i-20 स्फोटात उद्ध्वस्त झाली. तपासात उमरचा फरिदाबाद टेरर मॉड्यूलशी (Faridabad Terror Module) संबंध असल्याचे देखील दिसून आले आहे.

Continues below advertisement


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज संध्याकाळी 6:52 वाजता स्फोटापूर्वीचा आहे. व्हिडिओमध्ये लाल किल्ल्याजवळील सुनेहरी मशिदीजवळ कार पार्क केलेली दिसते, जिथे ती सुमारे तीन तास उभी होती. नंतर कारमध्ये स्फोट झाला, ज्यामुळे अमोनियम नायट्रेट इंधन तेलाचा वापर झाल्याचे सिद्ध झाले.  


Who is Doctor Umar: डॉ. मोहम्मद उमर कोण आहे?


उमर हा हरियाणातील फरीदाबाद येथील अल फला मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता. तपास यंत्रणांना संशय आहे की, तो फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला गेला आहे. उमर हा अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टर आदिल अहमद राथेरचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले जाते. ज्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. आदिलच्या चौकशीनंतर सोमवारी फरीदाबादमध्ये छापा टाकण्यात आला आणि उमरचे नाव समोर आले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी उमरची आई शहेमा बानो आणि भाऊ आशिक आणि झहूर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सूत्रांचा दावा आहे की, उमरने त्याच्या दोन साथीदारांसह कट रचला आणि फरीदाबादमध्ये अटक झाल्यानंतर घाबरून तो अंमलात आणला.


Faridabad Terror Module: फरिदाबाद टेरर मॉड्यूल म्हणजे काय?


हरियाणा आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत फरिदाबादमध्ये एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. तपासात मुझम्मिल शकील या काश्मिरी डॉक्टरच्या घरातून अंदाजे 360 किलो अमोनियम नायट्रेटसारखी स्फोटके आणि शस्त्रे सापडली. याव्यतिरिक्त, दुसऱ्या ठिकाणी 2563 किलो संशयास्पद स्फोटके सापडली. मुझम्मिलने हे घर भाड्याने घेतले होते आणि जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर लावल्याने त्याचा शोध घेतला जात होता. यापूर्वी, डॉ. आदिलला अटक करण्यात आली होती, तर डॉ. मोहम्मद उमरचा शोध सुरू होता. आता त्याचे नाव दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये समोर आले आहे. 



आणखी वाचा 


PM Modi On Delhi Blast : 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा