नवी दिल्ली: दिल्लीमध्ये घडलेल्या भीषण अपघातात (DelhiAccident) वित्त मंत्रालयातील (Finance Ministry) आर्थिक व्यवहार विभागाचे 57 वर्षीय उपसचिव नवज्योत सिंह (Navjot Singh) यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (15 सप्टेंबर 2025) रात्री घडला. या प्रकरणी बीएमडब्ल्यू (BMW Car) चालवणाऱ्या गगनप्रीत कौर या महिलेला पोलिसांनी सोमवारी अटक केली. तिच्यावर हत्या (Culpable Homicide) आणि अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवज्योत सिंह यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संदीप कौर होत्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, संदीप कौर यांनी गगनप्रीत कौरवर गंभीर आरोप केले आहेत.
Delhi BMW Accident : अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, नवज्योत सिंह आणि त्यांची पत्नी संदीप कौर बंगला साहिब गुरुद्वाराहून परत येत होते. त्यानंतर त्यांनी कर्नाटक भवनात जेवण केले आणि घरी परतत असताना गगनप्रीत कौरच्या बीएमडब्ल्यूने त्यांच्या बाईकला मागून धडक दिली. या धडकेत नवज्योत सिंह यांचा मृत्यू झाला, तर संदीप कौर गंभीर जखमी झाल्या.
पत्नीचे गंभीर आरोप
संदीप कौर यांनी पोलिसांना सांगितले की, अपघातानंतर नवज्योत यांचा श्वास सुरू होता. त्यांनी गगनप्रीतला जवळच्या रुग्णालयात नेण्याची वारंवार विनंती केली. मात्र गगनप्रीतने 19 किलोमीटर दूर असलेल्या न्यूलाईफ हॉस्पिटल (NuLife Hospital, GTB Nagar) मध्ये नेले. तपासात समोर आले आहे की गगनप्रीतच्या वडिलांचा या रुग्णालयाशी संबंध आहे.
पुरावे दडपण्याचा संशय
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गगनप्रीतने अपघातग्रस्तांना न्यूलाईफ हॉस्पिटलमध्ये नेले, जेणेकरून मेडिकल रिपोर्ट्समध्ये फेरफार करता येईल. मात्र, रुग्णालय प्रशासनाने सर्व नियमांचे पालन झाल्याचे सांगितले असून गगनप्रीतच्या कुटुंबाचा हॉस्पिटलशी संबंध असल्याचे नाकारले नाही. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
ही बातमीव वाचा:
