Delhi Blast दिल्लीत शुक्रवारी इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या तपासाची चक्र फिरली आणि आता या स्फोटमागचे एकएक धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल, क्राईम ब्रांच आणि एनआयए या तीन संरक्षण - तपास यंत्रणांकडून सदर प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्यादरम्यान आता या हल्ल्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आली आहे.


दिल्ली हल्ल्याची जबाबदारी घेणारी ही संघटना आहे जैश उल हिंद. सध्याच्या घडीला या संघटनेकडून हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली असली तरीही ही नेमकी कोणत्या प्रकारची संघटना आहे, यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि ही संघटना कोणाशी जोडली गेली आहे, ही कोणती स्लीपर सेल आहे का याबाबतचमी माहिती मात्र अद्यापही समोर आलेली नाही.


Viral Video | वाहनासाठी वाट काढताना शिवसैनिकांकडून रिव्हॉल्व्हर्सचं ब्रँडिंग


स्फोटाचं इराणी कनेक्शन


दिल्लीत स्फोट झालेल्या घटनास्थळापाशीच तपास यंत्रणांच्या हाती एक पत्र लागल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं या हल्ल्यामागचं इराणी कनेक्शन साऱ्यांचं लक्ष वेधत आहे. हा तर पक्त एक ट्रेलर आहे, अर्थात ही फक्त सुरुवात आहे असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे. शिवाय या पत्रात दोन इराणी व्यक्तींच्या हत्येचाही उल्लेख आहे. सेनेतील कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेणार असल्याचं लिहिण्यात आलं आहे. शिवाय यामध्ये अणुवैज्ञानिक आर्देशिर यांच्या हत्येचाही उल्लेख करण्यात आला आहे.


 इराणच्या आर्देशिर या नावाजलेल्या आर्देशिर यांची ड्रोन गनच्या माध्यमातून हत्या करण्यात आली होती. ज्यासाठी इराणकडून इस्रायलला दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यामुळं आता तपास जसजसा पुढे जात आहे तसतशी या हल्ल्याची पाळंमुळं समोर येत आहेत हेच स्पष्ट होत आहे.