Rajnath Singh : कारगिल विजय दिवसापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी जम्मूमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी 1999 च्या युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण केले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले, "मला त्या सर्व सैनिकांची आठवण आहे ज्यांनी देशसेवेत आपले प्राण अर्पण केले. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा आपल्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. 1999 च्या युद्धात ज्यांनी बलिदान दिले त्या सर्व जवानांना मी सलाम करतो.

Continues below advertisement

पं.जवाहरलाल नेहरूंवर काय म्हणाले?

या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला. 1962 च्या युद्धाबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, 1962 मध्ये चीनने लडाखमध्ये आमच्या जमिनीवर कब्जा केला. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. त्यांच्या हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही. पंतप्रधानांच्या हेतूंमध्ये कोणताही दोष असू शकत नाही, परंतु हे धोरणांना लागू होत नाही. मात्र, आता भारत जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे. 

संरक्षण मंत्री पीओकेबद्दलही बोलले

संरक्षण मंत्री म्हणाले की, आज भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. भारत बोलतो तेव्हा जग ऐकते. 1962 मध्ये आमचे जे नुकसान झाले त्याची आम्हाला जाणीव आहे. ते नुकसान आजपर्यंत भरून निघालेले नाही. पण आता देश मजबूत आहे. त्यांनी पीओकेबद्दल असेही सांगितले की यासंदर्भात भारताच्या संसदेत ठराव मंजूर करण्यात आला होता. हा भाग भारताचा होता आणि भारताचाच राहील. बाबा अमरनाथ आपल्यासोबत आणि आई शारदा सीमेपलीकडे असे होऊ शकत नाही.

Continues below advertisement

संरक्षण मंत्री सरस्वती देवीचे मंदिर असलेल्या शारदा पीठाबद्दल बोलत होते. हे पीओकेमधील मुझफ्फराबादपासून 150 किमी अंतरावर नीलम व्हॅलीमध्ये आहे. काश्मिरी पंडितांसाठी या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. काश्मिरी पंडितांची मागणी आहे की, करतारपूरप्रमाणे येथेही कॉरिडॉर बनवावा जेणेकरून शारदा पीठ पाहता येईल.

यावेळी भारतीय सैन्य 23 वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. हा दिवस 26 जुलै रोजी साजरा केला जातो आणि शहीदांचे स्मरण केले जाते. कारगिल युद्ध स्मारकात तीनदिवसीय कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत ज्यात अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या