नवी दिल्ली : डास चावून म्हणजेच मलेरियाने मृत्यू झाल्यास तो अपघात ग्राह्य धरला जाईल आणि त्यासाठी संबंधित व्यक्ती विम्यासाठी पात्र असेल, असा निर्वाळा राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिला आहे.
डास चावावा अशी कोणाचीही इच्छा नसते. साप चावून मृत्यू झाल्यास तो अपघात ग्राह्य धरला जातो. मात्र विमा कंपन्या मलेरियाने झालेला मृत्यू अपघात आहे, हे का स्वीकारत नाहीत, असा सवाल न्यायमूर्ती व्ही. के. जैन यांनी केला.
मोसमी भट्टाचार्यजी यांच्या पतीचा 2012 साली मलेरियाने मृत्यू झाला. मात्र विमा कंपनीने विमा देण्यास नकार दिला, त्यानंतर त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला.