वास्तविक, दिल्लीतील पान विक्रेता असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभाई लालवानी यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण शुक्रवारी त्यांचं निधन झालं. हरिभाई लालवानी यांना ‘गुटखा किंग’ म्हणूनही ओळखलं जातं.
लालवानी यांनी मृत्यूपूर्वी एक शेवटची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं की, “त्यांच्या मृत्यूनंतर कोणीही शोक व्यक्त करु नये. उलट त्यांच्या निधनादिवशी उत्सव साजरा करावा.”
लालवानींच्या इच्छेनुसार, मुलींनी वडिलांची अंत्ययात्रा अतिशय दणक्यात काढली. या अंत्ययात्रेसाठी बँड-बाजा लावण्यात आला होता. विशेष म्हणजे, मुलींनी यावेळी डान्स करुन वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली.
लालवानी यांना चारही मुलींनीच खांदा दिला. तर त्यांच्या एका मुलीने मुखाग्नी दिला.
प्रिंस गुटख्याचे मालक हरिभाई लालवानी 1990 च्या दशकात नोएडा एन्टरप्रेन्योर्स असोसिएशनचे अध्यक्ष झाले. त्यांनी 90 च्या दशकात एका छोट्या पान टपरीने आपल्या व्यवसायाची सुरुवात केली.
व्हिडीओ पाहा