अहमदाबाद(गुजरात): अहमदाबादमधील रस्त्यावर थरारक अपघात घडला. शहरातंर्गत वाहतूक करणाऱ्या पालिकेच्या बसचा ब्रेक फेल होऊन हा भीषण अपघात घडला. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

 

ब्रेक फेल झाल्यामुळे वळण न घेता ही बस सरळ गेली. तेव्हा दुसऱ्या बाजुनं एक कार येत होती. कारला या बसची धडक बसल्यानंतर कारच्या बाजूची अॅक्टिवा गाडी आणि त्याबाजूनं येणारी आणखी एक बस अशा तिन्ही वाहनांना या बसने रस्त्यावरुन बाजूला नेलं.

 

सीसीटीव्हीत कैद झालेल्या या अपघाताने जिवाचा थरकाप उडत आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला असला तरी अपघात हा भीषण होता. भर रस्त्यात रहदारी चालू असताना यामध्ये अनेकांचा जीव जाण्याची शक्यता होती.

 

पाहा व्हिडिओः