Crude Oil Price Hike : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावामुळे आणि अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड आणि WTI क्रूड या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी दोन आठवड्यांतील उच्चांक गाठला असून कच्च्या तेलाचा भाव 110 डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचला आहे. या घडामोडींमुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Continues below advertisement

सोमवारी ब्रेंट क्रूड सुमारे 1.3 टक्क्यांनी वाढून 110.70 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले, तर WTI क्रूड 1.7 टक्क्यांच्या वाढीसह 107.26 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होते. पश्चिम आशियातील अस्थिरतेमुळे तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर जागतिक बाजारात गुंतवणूकदार सावध झाले आहेत. संघर्ष वाढल्यास जागतिक पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे.

Continues below advertisement

Petrol Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार?

15 मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये प्रति लिटर वाढ केली होती. मात्र तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांचे नुकसान पूर्णपणे भरून काढण्यासाठी दरात आणखी 15 ते 20 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Oil Companies Loss : सरकारी तेल कंपन्यांना मोठा फटका

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांच्या मते, दर स्थिर ठेवल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना दररोज सुमारे 1,000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. अलीकडील 3 रुपयांच्या वाढीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी परिस्थिती अद्याप आव्हानात्मक आहे.

India Economy Impact : भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम?

कच्च्या तेलाचा भाव 100 ते 120 डॉलर प्रति बॅरल या पातळीवर दीर्घकाळ टिकल्यास महागाई वाढू शकते. वाहतूक, उत्पादन आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो.

Maharashtra Petrol Shortage : राज्यात इंधनाचा तुटवडा

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने जनता त्रस्त असतानाच, आता राज्यात इंधन तुटवडाही निर्माण झाल्याचं चित्र आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड झळकले आहेत. तर काही ठिकाणी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं. 

ही बातमी वाचा: