एक्स्प्लोर

Raja Raghuvanshi Case: हनीमुनचं नाटकं अन् नवऱ्याची निर्घृण हत्या; घटनेनंतर बसमधून प्रवास करताना शेजारची मुलगी पाहत होती राजा रघुवंशी हत्येच्या बातम्या, सोनम तिला ओरडली अन्...

Raja Raghuvanshi Case: उजालाने सांगितले की, सोनमने चेहरा झाकल्यामुळे ती तेव्हा ओळखू शकली नाही. एवढेच नाही तर तिने वाराणसी विमानतळावर दोन मुले देखील पाहिली आणि त्यांनीही त्यांचे चेहरे लपवले होते.

इंदूर: इंदूर येथून मेघालयमध्ये हनीमूनसाठी (Raja Raghuvanshi Case) गेलेल्या आणि तिथेच खून झालेल्या राजा रघुवंशी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पत्नी सोनम रघुवंशीनेच पतीच्या हत्येचा कट रचल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतंच, पण आता तिच्या हत्येनंतरच्या हालचालींबाबतही नव्या गोष्टी समोर येत आहेत. आधी असं समजलं जात होतं की, पती राजा रघुवंशीच्या (Raja Raghuvanshi Case) मृत्यूनंतर सोनमने राजनेच मागवलेल्या टॅक्सीने उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये पोहोचली. पण आता समोर आलंय की, सोनम गाझीपूरला बसने गेली होती, याबाबतचा दावा उजाला नावाच्या एका बसमधील सहप्रवासी मुलीने केला आहे. उजाला हिने 8 जून रोजी वाराणसीहून गाझीपूरसाठी बस पकडली होती. याच बसमध्ये सोनम तिच्याजवळील सीटवर बसली होती. सोनमने चेहरा पूर्णपणे झाकलेला होता, त्यामुळे सुरुवातीला उजालाला तिची ओळख पटली नव्हती.

राजाच्या आईचा भावनिक व्हिडिओ पाहत होती

उजालाने सांगितले की, बसमध्ये असताना ती इन्स्टाग्रामवर राजाच्या आईचा भावनिक व्हिडिओ पाहत होती. हे पाहून सोनमने तिला "अशा फालतू गोष्टी पाहू नकोस" असं ओरडून बजावलं होतं. यावरून सोनम ओळख उघड होईल याची धास्ती घेत होती, असा संशय निर्माण झाला आहे. दरम्यान, 23 मे रोजी राजा आणि सोनम शिलॉन्गमध्ये गायब झाले होते. 2 जून रोजी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील एका दरीत राजाचा मृतदेह आढळला. त्यानंतर 9 जूनला सोनम गाझीपूरमधील एका ढाब्यावर सापडली. तिने तिथून कुटुंबीयांना फोन करून माहिती दिली.

पोलिस तपासात समोर आलं आहे की, सोनमने तिच्या 5 वर्षांनी लहान प्रियकर राज कुशवाहा याच्यासोबत मिळून खूनाची योजना आखली होती. सोनमने आपल्या पतीचा खून राजाच्या नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने करवून घेतला. आकाश, विशाल आणि आनंद या तिघांमध्ये एक जण राजाचा चुलतभाऊ आणि दोघे मित्र होते. हे तिघं राजाला एका दरीजवळ घेऊन गेले आणि त्याचा खून करून मृतदेह दरीत फेकून दिला.

इंदूरची सोनम आणि राजा रघुवंशीची थरारक घटना

इंदूर शहरात नुकतंच विवाहबंधनात अडकलेल्या नवविवाहित जोडप्याच्या हनिमूनच्या ट्रिपचा शेवट अत्यंत भयावह ठरला आहे. राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह 11 मे रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर 20 मे रोजी हे दोघंही हनिमूनसाठी मेघालयातील शिलॉन्ग येथे गेले. मात्र 23 मेपासून दोघांचाही त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क तुटला होता, ज्यामुळे अपहरणाची शक्यता व्यक्त केली जात होती. दोन आठवड्यांच्या शोधानंतर, 2 जून रोजी शिलॉन्गमधील एका दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सोनमच्या अपहरणाची चर्चा जोरात सुरू झाली. मात्र 9 जून रोजी सोनम स्वतःच पोलिसांसमोर हजर झाली आणि प्राथमिक चौकशीतच एक धक्कादायक सत्य उघड झालं. पोलिस तपासात समोर आलं की, राजाच्या हत्येचा कट सोनमनेच रचला होता. नेमका खून कशा कारणाने झाला, यामागे आर्थिक व व्यक्तिगत कारणं होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party Jantar Mantar: कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav: वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
India vs Afghanistan: केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धाा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
Cockroach Janta Party Jantar Mantar: कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
Uddhav Thackeray :कॉकरोच ना कमी लेखू नका, हा जंतरमंतरवरील आंदोलनाचा इशारा, नीटच्या पीडित तरुण- तरुणींचा आक्रोश सरकारला ऐकावाच लागेल : उद्धव ठाकरे
हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेत रणरणत्या उन्हात रस्त्यावर; कॉकरोच ना कमी लेखू नका : उद्धव ठाकरे
Cockroach Janata Party: 'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल

Embed widget