एक्स्प्लोर

Crime News: मेरठनंतर आणखी एका नवऱ्याचा बळी! लग्नाच्या 15 व्या दिवशी बायकोने शुटरला सुपारी देऊन संपवलं, संपत्ती घेऊन प्रियकरासोबत...

Crime News: पत्नीने लग्नातून मिळालेले पैसे आणि दागिने विकले आणि शूटरला एक लाख रुपये अॅडव्हान्स पैसे दिले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबई: मेरठमध्ये प्रेमविवाह झालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या (Crime News) केली असतानाच आता उत्तर प्रदेशच्या औरैयामध्ये असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. औरैयामध्ये लग्न होऊन फक्त 15 दिवस झालेले असताना पत्नीने पतीची हत्या (Crime News) केल्याची माहिती समोर आली आहे. नव्या नवरीने आपल्या नवऱ्याला संपवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने शूटरला दोन लाखांची सुपारी दिली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे. पत्नीने लग्नातून मिळालेले पैसे आणि दागिने विकले आणि शूटरला एक लाख रुपये अॅडव्हान्स पैसे दिले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News)

घरच्यांनी तिचे लग्न परवानगी शिवाय

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी प्रगती यादव, तिचा प्रियकर अनुराग यादव आणि सुपारी किलर रामजी नागर या तिघांना (Crime News) अटक केली आहे. नववधूने लग्नाच्या आधीच प्रियकरासह पतीचा खून करण्याचा कट रचला होता. घरच्यांनी तिचे लग्न दिलीप सोबत तिच्या परवानगी शिवाय लावून दिले होते. विधवा झाल्यानंतर पतीची कोट्यवधींची संपत्ती ताब्यात घेऊन आपल्या प्रियकरासोबत (Crime News) राहायचं, असा तिचा प्लॅन होता, असे पोलिसांनी सांगितले. दिबियापूर येथे राहणारा दिलीप (21) याचा विवाह प्रगतीशी 5 मार्च रोजी झाला. दिलीपचे कुटुंब व्यापारी आहे.(Crime News)

दिलीपला एकटे गाठून त्याची हत्या

कुटुंबात 20 हून अधिक हायड्रा मशीन आणि क्रेन आहेत. दिलीपला एकटे गाठून त्याची हत्या करण्यात आली. त्याच्यावर गोळीही झाडण्यात आली होती. प्रगती यादरम्यान व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शूटर्सच्या संपर्कात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नव्या नवरीने आपल्या नवऱ्याला संपवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने शूटरला दोन लाखांची सुपारी दिली होती, अशी माहिती देखील समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

मर्चंट नेव्हीमधील पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याची त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली आहे. तसेच हत्या करून पतीच्या मृतदेहाचे 15 तुकडे केले आणि सिमेंटने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये ते लपवले. पोलिसांनी मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला अटक केली आहे. सौरभ राजपूत नुकताच लंडनहून भारतात परतला होता. 2016 रोजी सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता. मेरठ येथे एका भाड्याच्या घरात हे जोडपे पाच वर्षांच्या मुलीसह तीन वर्षांपासून राहत होते. सौरभ शेवटचा 4 मार्च रोजी दिसला होता, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajnath Singh : पश्चिम आशियातील तणावावर केंद्र सरकार सतर्क; राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दीड तास बैठक, इंधन-खत पुरवठ्याचा आढावा
पश्चिम आशियातील तणावावर केंद्र सरकार सतर्क; राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दीड तास बैठक, इंधन-खत पुरवठ्याचा आढावा
Cheapest Gold Price: भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, काय आहेत कारणं? सोन्याचे दर वेगवेगळे का असतात? जाणून घ्या सविस्तर
भारतातील 'या' राज्यांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, काय आहेत कारणं? सोन्याचे दर वेगवेगळे का असतात? जाणून घ्या सविस्तर
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Suvendu Adhikari: CM शुभेंदू अधिकारींच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय; पश्चिम बंगालमध्ये 'डबल इंजिन' सरकार सुसाट!
CM शुभेंदू अधिकारींच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय; पश्चिम बंगालमध्ये 'डबल इंजिन' सरकार सुसाट!

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Mumbai Crime News: पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
Embed widget