हैदराबाद : कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. अशातच जगभरातील अनेक वैज्ञानिक या व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी लस शोधण्याचा प्रयत्नात आहेत. अशातच भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारतात कोरोनावर लस शोधण्यात येत असून भारतीय औषधि महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. 'कोवॅक्सिन' नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे.


देशात पुढिल महिन्यात या लसीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची चाचणी सुरु करण्यात येणार आहे. कंपनीने एका वक्तव्यामध्ये सांगितलं की, लस विकसित करण्यासाठी आयसीएमआर आणि एनआयव्हीचं मदत महत्त्वपूर्ण आहे.


दरम्यान, आतापर्यंत कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी कोणत्याही प्रकारची लस किंवा औषध उपलब्ध नाही. तसेच कोरोना संसर्ग वेगाने फैलावत आहे. देशात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


देशात आतापर्यंत 548318 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोक कोरानामुक्त झाले आहेत. तर दोन लाखांहून अधिक लोक सध्या उपचार घेत आहेत. तर कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने आतापर्यंत देशात 16 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.


पाहा व्हिडीओ : भारतातीय कोविड-19 लस 'Covaxin'ला क्लिनिकल ट्रायलची परवानगी



1 जुलैपासून देशात अनलॉक -2


केंद्र सरकारने एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अनलॉक 2 अंतर्गत मोदी सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. 30 जून रोजी लॉकडाऊन संपत आहे. अनलॉकचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. दरम्यान मोदी सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. 'अनलॉक'च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. अनलॉक 2 मध्ये असणारी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


कोरोनावर औषध मिळालं! 'डेक्सामेथासोन'नं रुग्ण बरे होत असल्याचा दावा


COVID-19 Symptoms List | कोविड-19 ची तीन नवीन लक्षणे समोर!


'आपण धोकादायक टप्प्यावर, कोरोना अत्यंत वेगाने पसरतोय' : WHO