Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूच्या 10 हजार 488 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 313 रुग्णांचा मृत्यू झाला. याच कालावधीत 12 हजार 329 जणांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे.


देशातील सध्याची कोरोना स्थिती -
एकूण कोरोना रुग्णांची संख्या : 3,45,10,413
एकूण कोरोनामुक्तांची संख्या : 3,39,22,037
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या : 4,65,662 
उपचाराधीन रग्णांची संख्या : 1,22,714
एकूण लसीकरण : 1,16,50,55,210





केरळनं देशाची चिंता वाढवली :

देशाची दैनंदिन रुग्णसंख्यांमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. अशातच केरळने मात्र देशाची चिंता वाढवली आहे. केरळमधील रुग्णांच्या सख्येत वाढ झालेली पाहायला मिळत नाही. देशाच्या एकूण रुग्णसंख्यापैकी 50 टक्के रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत. मागील 24 तासांत केरळमध्ये 6,075 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 


सलग 44व्या दिवशी 20 हजारांहून कमी रुग्ण - 
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसची दैनंदिन आकडेवारी सलग 44व्या दिवशी 20 हजाराहून कमी आहेत. सलग 147व्या दिवशी 50 हजारांहून कमी आहेत. दैनंदिन संसर्गाचा दर 0.98 टक्के नोंदवण्यात आला, जो गेल्या 48 दिवसांतील दोन टक्क्यांनी कमी आहे. साप्ताहिक संसर्गाचा दर 0.94 टक्के नोंदवण्याता आला आणि हा गेल्या 58 दिवसांत दोन टक्क्यांनी कमी आहे.


116 कोटी डोस – 
कोरोनाविरोधात देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंक 116 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत 116 कोटी 50 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत.


राज्यातील कोरोनाची स्थिती काय?
 राज्यात आज 833 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर  2, 271रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 74 हजार 952 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे. राज्यात आज 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 10 हजार 249  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 97 हजार 693  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1002 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 45 , 94, 210 प्रयोगशाळा  तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत आज 195 रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू
गेल्या 24 तासात मुंबईत 195 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 351 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 2845 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,39,426 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 2649 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे.