COVID-19 India Death : जगभरात 10 दिवसांमध्ये कोरोनानं सर्वाधिक मृत्यू हे भारतात झालेत. मागील 10 दिवसात भारतात 36 हजार 110 रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मागील 10 दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद भारतात झाली आहे. याआधी अमेरिकेचा पहिला क्रमांक होता. तिथे 10 दिवसात 34 हजार 798 रुग्णांचा बळी गेला होता. त्यानंतर ब्राझीलमध्ये 32 हजार 692 जणांचा 10 दिवसात कोरोनानं मृत्यू झाला आहे. पण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतानं अमेरिका आणि ब्राझीललाही मागे टाकलंय. मागच्या 10 दिवसात भारतात तासाला 150 लोकांचा कोरोनानं जीव घेतला आहे. 


जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. भारतातील कोरोना संसर्गानं सर्व देशांना मागे टाकलं आहे. आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येतही भारतानं सर्व देशांचा रेकॉर्ड मोडला आहे. आता अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा अधिक होता. परंतु, गेल्या 10 दिवसांत भारतात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. गेल्या 10 दिवसांत भारतात कोरोनामुळे 36,110 लोकांनी जीव गमावला आहे. काल म्हणजेच गुरुवारी देशात 4.14 लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर यामुळे  3927 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  


पाहा व्हिडीओ : मागील 10 दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद भारतात



देशात प्रति तास 150 रुग्णांचा मृत्यू


गेल्या 10 दिवसात दररोज 3000 च्या आसपास कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहेत. यादरम्यान, 36,110 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ, देशात प्रतितास 150 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे होत आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, 10 दिवसांत यापूर्वी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले होते. 10 दिवसांच्या कालावधीत अमेरिकेत सर्वाधिक 34 हजार 798 रुग्णांचा बळी गेला होता. त्यानंतर ब्राझीलमध्ये 32 हजार 692 जणांचा 10 दिवसात कोरोनानं मृत्यू झाला होता. तर मेक्सिकोमध्ये 10 दिवसात 13, 897 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर ब्रिटनमध्ये 13,266 मृत्यू झाला होता. 


गेल्या 24 तासांत भारतात 4,14,188 नव्या कोरोनाबाधित, तर 3,915 रुग्णांचा मृत्यू


India Corona Case Updates : भारतात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. दररोज समोर येणारे कोरोनाबाधितांचे आकडे धडकी भरवणारे आहेत. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. एवढंच नाहीतर देशातील मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाचनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 4,14,188 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर  3,915 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 लाख 31 हजार 507 रुग्ण उपचारावर मात करुन घरी परतले आहेत. 


देशातील आजची कोरोना स्थिती : 


एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 14 लाख 91 हजार 598
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 72 लाख 12 हजार 351
एकूण सक्रिय रुग्ण : 36 लाख 45 हजार 164
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 34 हजार 083
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 16 कोटी 49 लाख 73 हजार 58 डोस


महत्त्वाच्या इतर बातम्या :